महागाई विरोधात सातपुडय़ात काँग्रेसतर्फे पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:08 PM2018-10-15T12:08:16+5:302018-10-15T12:08:22+5:30

नंदुरबार :  पेट्रोल-डिङोल दरवाढ, वाढती महागाई, आदिवासी विरोधातील निर्णयाच्या निषेधार्थ आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी नकटय़ादेव-गोरामाळ ते रापापूर या दुर्गम भागातून ...

Satyapudayya Congress in protest against inflation | महागाई विरोधात सातपुडय़ात काँग्रेसतर्फे पदयात्रा

महागाई विरोधात सातपुडय़ात काँग्रेसतर्फे पदयात्रा

Next

नंदुरबार :  पेट्रोल-डिङोल दरवाढ, वाढती महागाई, आदिवासी विरोधातील निर्णयाच्या निषेधार्थ आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी नकटय़ादेव-गोरामाळ ते रापापूर या दुर्गम भागातून पदयात्रा काढून गाव, पाडय़ातील जनतेशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध विकास कामांचे देखील उद्घाटन केले.
पेट्रोल, डिङोलचे वाढते दर, वाढती महागाई, आदिवासींच्या विरोधातील निर्णय याबाबत दुर्गम भागातील जनतेत जागृती व्हावी व त्याचा निषेध व्हावा यासाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी चार दिवसांपासून दुर्गम भागातील नकटय़ादेव ते रापापूर या दरम्यान पदयात्रा काढली. डोंगर, द:या, पायवाटने जात त्यांनी वाडय़ा, पाडय़ातील जनतेशी संवाद साधला. मोदी सरकारने आदिवासींच्या योजनांची कशी वाट लावली. विद्याथ्र्याच्या विरोधातील निर्णय यामुळे कसा परिणाम होत आहे याची माहिती ते जनतेला देत आहे. जनतेकडून देखील विविध समस्या व प्रश्न मांडले जात आहेत. 
पदयात्रेदरम्यान त्यांनी नकटय़ादेव येथे अस्तंभा यात्रेसाठी येणा:या भाविकांकरीता एक लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन   केले. याशिवाय विविध ठिकाणी रस्ताकाम, फरशीपूल यांच्याही कामांचा शुभारंभ त्यांनी केला. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सी.के.पाडवी, सदस्य रतन पाडवी, सिताराम राऊत, काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रम पाडवी, विजय पाडवी, धडगाव पंचायत समिती सभापती कालुसिंग पाडवी, अक्कलकुव्याचे बिज्या वसावे, रवींद्र पाडवी, खेमा पराडके, गोविंदा वेच्या , सुरेश वळवी, वाण्या दौलत पाडवी यांच्यासह धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.    

Web Title: Satyapudayya Congress in protest against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.