नंदुरबार पाणीदार करणार : सरपंच कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:25 AM2019-01-19T11:25:38+5:302019-01-19T11:25:43+5:30

नंदुरबार : पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील सर्वच गावांनी सहभागी होवून नंदुरबार तालुका पाणीमय करावा. यासाठी बचत गटांतील ...

Sarpanch workshop will be done by Nandurbar: | नंदुरबार पाणीदार करणार : सरपंच कार्यशाळा

नंदुरबार पाणीदार करणार : सरपंच कार्यशाळा

Next

नंदुरबार : पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील सर्वच गावांनी सहभागी होवून नंदुरबार तालुका पाणीमय करावा. यासाठी बचत गटांतील महिलांनी लोकचळवळ उभी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील पाणी फांऊंडेशनमध्ये सहभागी झालेल्या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, बचत गटांच्या महिला यांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
उदघाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिपप्रज्वलनाने केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, पाणी फांऊडेशनचे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय व्यवस्थापक ए.के. धानापुणे, विभागीय वन अधिकारी आर.एम. जेजुरकर उपस्थित होते.
डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, महिलांनी पुढे येवून या वॉटर कप स्पर्धेत आपले गाव सहभागी होण्यासाठी प्रय} करावा, पाण्याच्या बचतीसाठी लोकचळवळ उभी करावी व गावातील सर्व महिलांना या लोकचळवळीत सहभागी करुन घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याचा सर्व स्तरावर गरज लक्षात घेता शाळा, महाविद्यालय यांनी या स्पर्धेत सहभागी होवून लोकसहभागाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करावी. 
महिलांनी वृक्ष लागवडीवर जास्त भर दिला पाहिजे. भविष्यात पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावर हंडा दिसू नये यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी   सांगितले.
 

Web Title: Sarpanch workshop will be done by Nandurbar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.