रस्ता कामामुळे वाहतूक वळविल्याने 26 वसाहतींमधील नागरिक झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:49 AM2019-07-15T10:49:36+5:302019-07-15T10:49:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी ...

Road to work due to road traffic becomes a citizen of 26 colonies | रस्ता कामामुळे वाहतूक वळविल्याने 26 वसाहतींमधील नागरिक झाले हैराण

रस्ता कामामुळे वाहतूक वळविल्याने 26 वसाहतींमधील नागरिक झाले हैराण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नागरिकांच्या सोयीसाठी धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाला सुरु झाले आह़े यासाठी नंदुरबार-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आह़े  कोणत्याही नियमनाअभावी अवजड वाहने भरधाव वेगात कॉलन्यांमधून धावत असल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़    
याबाबत धुळे चौफुली परिसरातील 26 कॉलन्यांमधील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आह़े निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोणे फाटा ते मुस्लिम कब्रस्तान या दरम्यान  पाईप मोरी बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरण काम सुरु झाले आह़े यातून  मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तीन महिन्यांपयर्ंत रस्ता काम सुरु राहणार असल्याने भोणे फाटा, विश्वकर्मा मंदिर, नगराध्यक्ष वेडूभाऊ गोविंदभाऊ राजपूत मार्ग,राजपूत पेट्रोल पंप, धुळे चौफुली, जाणता राजा चौकातून वाहतूक वळवण्यात आली आह़े परंतू वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षा अधिक राहत असल्याने नागरिकांसाठी वळवलेली वाहतूक अडचणीची ठरत आह़े परिसरात फिरणा:या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह दुचाकीस्वारांना अडचणी येत आहेत़ शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना या अवजड वाहनांच्या वेगाचा फटका बसू शकतो़ अवजड वाहनचालकांना कोणत्या मार्गाने जावे यासाठी मार्गदर्शक फलक नसल्याने अडचणी येत आहेत़ मध्येच वाहने वळवण्याचे प्रकार होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन रस्तेही खराब होत आहेत़ परिणामी वाहतूक वळवलेल्या मार्गावर  वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन जागोजागी गतिरोधक टाकले जावेत़ रात्रीच्यावेळी योग्य तेथे बॅरीकेटींग करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आह़े  

 26 कॉलन्यांमधील नागरिकांसोबतच जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़राम रघुवंशी, नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कैलास पाटील,अविनाश माळी आदींनी या प्रकाराकडे लक्ष वेधून घेत प्रशासनाला निवेदन दिले आह़े कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आह़े धुळे चौफुली परिसरातील महाराणा प्रताप नगर, जाणता राजाचौक, नेहा पार्क, गांधी नगर, राजीव गांधी नगर, राम नगर, जयंतीलाल नगर, पद्मावती नगर, देवचंद नगर, सोनाबाई नगर, सोनाई नगर, गाझी नगर, अनिल नगर, लक्ष्मीनारायण नगर, जय गुरुदेव नगर, हरिभाऊ नगर, ज्ञानदीप सोसायटी नगर, गोपाळ नगर, एलिझा नगर, वर्धमान नगर, शांती नगर, ओम शांती नगर, वाघेश्वरी नगर, रुक्मिणी नगर, शहाबाई नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचला होता़ लवकरच याबाबत उपाययोजना होण्याची शक्यता आह़े 

Web Title: Road to work due to road traffic becomes a citizen of 26 colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.