परसबागेद्वारे पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:38 PM2019-07-21T12:38:55+5:302019-07-21T12:39:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेत परसबाग तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, एकात्मिक ...

Resolution of improving nutrition status by Parsabagga | परसबागेद्वारे पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प

परसबागेद्वारे पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेत परसबाग तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा आणि युनिसेफ मुंबई यांनी संयुक्तपणे हाती घेतला असून त्या माध्यमातून विद्याथ्र्याची पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प भांग्रापाणी आश्रमशाळेत आयोजित कार्यशाळेत करण्यात आला. 
युनिसेफद्वारा दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी 17 आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक आणि विद्याथ्र्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात  आले. प्रशिक्षणात तज्ञांनी पोषण परसबागेचे महत्त्व सांगितले. यावेळी परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यात चार बाय 20 अंतराच्या जागेत नऊ इंच उंचीचा मातीचा बेड तयार करून घेण्यात आला. या परसबागेला कमी पाणी लागते आणि त्यात बेडवर   फळभाज्या, वेलवर्गीय व पालेभाज्या तर बेडभोवती शेवगा, हादगा, पपई, आवळा, लिंबू आदी झाडे लावता येतात. युनिसेफतर्फे 12 प्रकारच्या भाज्या व शेवग्याची रोपे पुरविण्यात आली आहेत. नंतरच्या टप्प्यात स्थानिक पातळीवर बियाणे बँक तयार करून स्वावलंबी करण्यात येणार आहे.
जुलै अखेर्पयत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सर्व आश्रमशाळेत परसबाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी युनिसेफद्वारे संनियंत्रण करण्यात येणार असून प्रकल्प अधिकारी  तळोदा आढावा घेणार आहेत. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ.गोपाळ पंडगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी  रमेश डुडी, अतिरिक्त प्रकल्प  अधिकारी एस.आर. सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तक्षय  आणि कुपोषणापासून विद्याथ्र्याना  दूर ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जेवणात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आवश्यक आहेत. त्याचे महत्व विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर भाज्यांची उपलब्धता करून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Resolution of improving nutrition status by Parsabagga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.