पुलासाठी ग्रामस्थांचे खासदारांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:35 PM2018-07-16T13:35:42+5:302018-07-16T13:35:48+5:30

खेडले ते पिसावर : छोटा धनपूर ते मोड रस्ता दुरुस्तीची मागणी

Residents of the villagers | पुलासाठी ग्रामस्थांचे खासदारांकडे साकडे

पुलासाठी ग्रामस्थांचे खासदारांकडे साकडे

Next

बोरद : खेडले ते पिसावर दरम्यान गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यातील 22 खेडय़ांना जोडणा:या पुलाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याकडे केली आह़े हा पुल तयार केल्यास 22 गावातील ग्रामस्थांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आल़े 
याबाबत डॉ़ गावीत यांना मोड येथील ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात येऊन पुलाबाबत पाठपुरावा करावा असे साकडे घालण्यात आले आह़े सातपुडय़ाच्या कुशित असलेल्या जुवानी, धजापाणी, लाखापूर, मालदा, तुळाजा, करडे, छोटा धनपूर, न्युबन ही अतिदुर्गम भागात मोडली जाणारी महाराष्ट्राच्या हद्दीतील गावे तसेच गुजरात राज्याच्या हद्दीतील पिसावर, उभद, लिंबारा, सदगव्हाण आदी सिमेवरील गावे अशी एकूण 22 गावांना या पुलाचा फायदा होणार आह़े 
त्याच प्रमाणे पुलाअभावी ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबण्यासही यानिमित्ताने मदत होणार आह़े नाल्यावरील पुल तुटल्याने 23 किमी अंतराचा वळसा घालून नंदुरबार व शहादा तसेच विविध गावांना जावे लागत आह़े त्यामुळे वेळ व पैसा दोघांचाही अपव्यय होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आह़े 
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आह़े छोटा धनपूर ते मोड, कळमसरे, मोहिदा आदी विविध रस्त्यांची मोठय़ा  प्रमाणात दुरावस्था झाली आह़े त्यामुळे येथील ग्रामस्थांसह विद्याथ्र्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आह़े पावसाळा असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े 
दरम्यान, देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच जयसिंग माळी, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, दिलीप चौधरी, ब्रिजलाल चव्हाण, भिमा चौधरी, किशोर पाटील, दिगंबर चव्हाण, काशिनाथ चौधरी, संजय चौधरी, डॉ़ नंदकिशोर चौधरी, डॉ़ छोटू चौधरी, आनंद चौधरी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़ 
 

Web Title: Residents of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.