तिन्ही पक्षाच्या तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला : नवापूर पालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:10 PM2017-12-12T12:10:54+5:302017-12-12T12:11:33+5:30

Reputation of the respective candidates of the three parties: Navapur Municipality Election | तिन्ही पक्षाच्या तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला : नवापूर पालिका निवडणूक

तिन्ही पक्षाच्या तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला : नवापूर पालिका निवडणूक

Next

प्रा.आय.जी.पठाण । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांवर आपला प्रभाव पाडण्यासह त्यांचे मत आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने प्रय}ांची पराकाष्ठा केली. मतदार राजा आता कुणाच्य पारडय़ात आपले मत टाकतो यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी होणा:या निवडणुकीकरीता झालेला प्रचार शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेस प्रय}ात आहे तर  काँग्रेसकडुन ही सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्थीचे प्रय} होत आहेत.  
जनतेच्या पसंतीवर खरे उतरण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपापल्या समर्थकांसह स्वत:सह पक्षासाठी पॅनलला मते मागण्यासाठी एक नव्हे तर दोन ते तीन वेळा मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. मतदानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखविण्यासाठी मतदान यंत्राचे डेमो देखील करुन दाखविण्याचे कार्य उमेदवार व समर्थक कार्यकत्र्यांनी पार पाडले आहे. शहराला लोकनियुक्त नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यासाठी भाजपा शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा व समाजवादी पक्ष व नवापूर विकास आघाडीचे सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. नगरसेवका वीस जागांसाठी दहा प्रभागांमधे 95 उमेदवारांमध्ये निवडणुकीचे घमासान आहे.    भारतीय राष्ट्रीय  काँग्रेसच्या उमेदवार हेमलता अजय पाटील यांच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी हाताळली. गटनेते गिरीश गावीत, दिलीप गावीत, आर. सी. गावीत व कार्यकत्र्याची मोठी फळी त्यांना सहकार्य करीत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार ज्योती जयस्वाल यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी प्रचाराची धूरा सांभाळली. पक्षाचे एजाज शेख, अनिल वसावे, शैलाबाई टिभे, कमलेश छत्रीवाला, घन:शाम परमार सेनेचे हसमुख पाटील, गणेश वडनेरे व सहकारी सोबत राहिलेत. भाजपकडून प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभांचे आयोजन शहरात झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अर्चना गोरजी वळवी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार शरद गावीत यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. नरेंद्र नगराळे, इम्तियाज लाखाणी, युसुफ फ्रुटवाला, डॉ. इम्रान शेख त्यांच्या सोबतीला आहेत. नवापुर विकास आघाडीच्या सोनल धर्मेद्र पाटील यांचा प्रचार आघाडीच्या पदाधिका:यांनी नियोजन पूर्वक केला. आघाडीची धुरा संदीप पारेख, मंगेश येवले, अॅड. नितीन देसाई यांनी सांभाळली.  
निवडणुकीत सर्वसाधारण प्रभागांमधे उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने बंडखोरी पक्षाच्या उमेदवारांसाठी डोकेदूखी ठरली आहे. ही बंडखोरी कुणास तारते किंवा नुकसानकारक ठरते हे लवकरच कळेल. जवळपास सर्वच प्रभागांमधे बहुरंगी लढती आहेत.  त्यातुन काही जागांवर अनपेक्षित निकाल येण्याची चिन्हे आहेत. 
 

Web Title: Reputation of the respective candidates of the three parties: Navapur Municipality Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.