जळगाव- जिल्हा पोलीस दलातील साहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या १५ पोलीस अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर बदल्या झाल्या आहेत. जळगावात दोन पोलीस निरीक्षक बाहेरून येत आहेत.
राज्याच्या गृहविभागातर्फे ३९४ साहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यात जळगाव येथील गोकुळ मोरे हे नंदुरबारला, शरद इंगळे हे अमरावती ग्रामीणला, पी.व्ही.पवार हे जालना, भालचंद्र पगार हे डीटीएस नाशिक, विश्वजित काईंगडे यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. तर ठाणे शहर येथील चंद्रकांत सरोदे व लोहमार्ग नागपूर येथील रामेश्वर गाडे हे जळगावात येत आहेत.
राज्यातील एक हजार ११० उपनिरीक्षकांना साहाय्यक निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. उपनिरीक्षक असलेले तुकाराम अडावदकर, मच्छिंद्र चव्हाण, बाळू सोनवणे, किसन राठोड, सुनील मेढे, नितीन पाटील, तृष्णा गोपनारायण, मालती कायटे यांची नाशिक परिक्षेत्रात साहाय्यक निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर दिलीप शिरसाठ यांची दहशतवादी विरोधी पथक आणि निता कायटे यांची ओबीसी विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे.