प्रवाशांकडून वसूल केली जातेय खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:51 PM2018-06-17T12:51:54+5:302018-06-17T12:51:54+5:30

रेल्वेतील ‘ग्राऊंड रिपोर्ट’ : हाताला लागले असल्याचे भासवण्यासाठी ‘स्टिकर्स’चा वापर

Ransom is being collected from the passengers | प्रवाशांकडून वसूल केली जातेय खंडणी

प्रवाशांकडून वसूल केली जातेय खंडणी

Next

नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणा:या रेल्वे गाडय़ांमध्ये महिला व 10 ते 14 वर्ष वयोगटातील बालिकांची टोळी सक्रिय झाली आह़े त्यांच्याकडून रेल्वेतील प्रवाशांजवळ पैशांचा तगादा लावण्यात येत आह़े हाताला काही तरी भिषण लागले आहे, असे भासविण्यासाठी ‘स्टिकर्स’चादेखील वापर केला जात आह़े त्यामुळे या किळसवाण्या प्रकारामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत़
चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये काही दिवसांपासून दान ते तीन महिला व 10 ते 14 वयोगटातील बालिकांकडून भिक मागून पैसा जमा करण्याचा व्यवसाय करण्यात येत आह़े जास्तीत जास्त प्रवासी कशा प्रकारे पैसे देतील यासाठी महिलांकडून एक अनोखी शक्कल लढवली जात आह़े प्रवाशांना दया-मया यावी म्हणून संबंधित बालिकांच्या हाताला काही तरी गंभीर इजा झाली आहे, असे भासवण्यासाठी बनावट स्टिकर्स लावण्यात येत आहेत़ तसेच हाताला, पायाला गँगरीन झालाय, डोळ्यांनी दिसत नाही, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची आहे आदी विविध बहाने सांगून प्रवाशांकडून पैशांची मागणी करण्यात येत आह़े प्रवाशांनी पैसे देण्यासाठी टाळाटाळ केल्यास दबरजस्ती पैशांचा तगादा लावला जात आह़े हाताला लावण्यात येणारे स्टिकर्स इतके खरेखुरे वाटतात की त्यामुळे अनेक प्रवाशांना हाताला खरच गंभीर इजा झाली असल्याचे खरेसुध्दा वाटत़े संबंधित बालिका हाताला लावण्यात आलेले स्टिकर्स मुद्दाम प्रवाशांच्या जवळ नेत असतात़ त्यामुळे नाईलाजास्तव किळस किंवा दया येऊन अनेक प्रवासी पैसे देवून मोकळे होत असतात़ हा अत्यंत भिषण प्रकार मुख्यत पश्चिम रेल्वे मार्गावर धावणा:या रेल्वे गाडय़ांमध्ये होत आहेत़ त्यामुळे याला कुठेतरी आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
प्रवाशांना होतोय मनस्ताप
संबंधित भिक्षुकी महिला व बालिका थेट आरक्षित रेल्वे बोग्यांमध्ये शिरुन प्रवाशांकडून एकप्रकारे पैशांची खंडणीच वसूल करीत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आह़े कमी अधिक सर्वच रेल्वे गाडय़ांमध्ये अशीच परिस्थिती आह़े एकीकडे प्रवासी भलामोठा पैसा मोजून रेल्वेचे आरक्षण करीत असतात़  अनेक प्रवासी सामान्य बोगींमधील धकाधकीपासून मुक्तता व्हावी म्हणून आरक्षण करुन आपला प्रवास सुकर व्हावा अशी अपेक्षा बाळगत असतात़ परंतु रेल्वेमधील भिका:यांमुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले जात असल्याचे सांगण्यात येत आह़े रेल्वेत अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने अनेक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आह़े दरम्यान, प्रवाशांना भिक्षुकांप्रमाणेच रेल्वेत फिरणा:या विनापरवाना फेरीवाल्यांचाही मोठय़ा प्रमाणात त्रास होत आह़े अनेक वेळा प्रवाशांना अरेरावीसुध्दा होत असत़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितल़े
 

Web Title: Ransom is being collected from the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.