दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:53 PM2019-07-20T12:53:05+5:302019-07-20T12:53:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : 15 दिवसांपासून दडी मारणा:या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी प्रतापपूर ता़ तळोदा येथील महिला ...

Raniqajal mother's leg to give a begging rain | दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी

दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : 15 दिवसांपासून दडी मारणा:या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी प्रतापपूर ता़ तळोदा येथील महिला आणि युवतींनी सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर येथील राणी काजल मातेची पायी वारी केली़ देवीला साकडे घालून ‘पाऊस पडू दे’ अशी आजर्व करत महिला व युवतींनी येथे पूजन केल़े 
तळोदा तालुक्यात सुरुवातीच्या काळात दमदार हजेरी लावणा:या पावसाने 15 दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाऊस नसल्याने वातावरणात बदल होऊन उष्णतेत वाढ झाली आह़े परिणामी कोवळी पिके करपू लागली आहेत़ कापसासह तूऱ केळी, ज्वारी यासह इतर धान्य आणि तेलबिया पिकांची दयनीय स्थिती झाली आह़े पाण्याची पातळी आधीच खोल गेल्याने पिकांना पाणी मुकि झाले असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ 
पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन व्हावे यासाठी शुक्रवारी सकाळी प्रतापपूर गावातील महिला आणि युवतींनी राणीकाजल मातेला नवस बोलून सहा किलोमीटर अंतरावरील राणीपूर येथील मंदिरार्पयत पायी वारी काढली़ सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेला कळस घेत पारंपरिक गीते गाऊन वाट धरली होती़ राणीपूर येथील राणीकाजल देवीला साकडे घातल्यास हमखास पाऊस येतो अशी धारणा असल्याने प्रतापपूर 100 ते 150 महिला व युवतींनी ही पायी वारी केली़ राणीपूर येथील मंदिरावर पोहोचल्यानंतर घरुन सोबत घेतलेल्य पाण्याने देवीच्या मूर्तीला अभिषेक करुन मंदिराची साफसफाई केली़ 
प्रतापपूर येथून निघताना महिलांनी घरोघरी जोगवा मागितला होता़ मंदिरावर प्रसाद तयार करुन भोजन करुन उपवासाचीही सांगता करण्यात आली़ प्रतापपूर परिसरात गेल्या वर्षीही पावसाने रडतखडत हजेरी लावल्याने शेतक:यांना दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले होत़े यंदाही तशी स्थिती उद्भवू नये म्हणून शेतकरी प्रार्थना करत आहेत़ 
 

Web Title: Raniqajal mother's leg to give a begging rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.