Punjab seized from liquor Dhadgaon taluka | पंजाबमधील दारू धडगाव तालुक्यातून जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यातील जलोला येथे पंजाबमध्ये विक्रीचा परवाना असलेला अवैध दारूसाठा पोलीसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतला़ पावणे नऊ लाखांच्या दारूसह 10 लाखांचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आह़े 
मोलगी पोलीसांच्या पथकाने जलोला ता़ धडगाव येथे ही कारवाई केली़ ट्रक रस्त्यात उभा करून तो खाली करण्याचे काम मजूर करत होत़े पोलीस याठिकाणी गेले असता ट्रकचालक आणि मजूर पसार झाल़े 
मोलगी पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी सकाळी एका गुन्ह्यातील फरार आरोपी गुलाबसिंग पारता वसावे याच्या शोधात पिंपरापाणी येथे गेले होत़े याठिकाणी गुलाबसिंग हा मिळून आला नाही़ तो जलोला येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली़ यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शिरसाठ, मुंगल्या पाडवी हे जलोला येथे जात असताना 11़45 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला आऱज़े11 जी़ए़ 1947 या ट्रकमधून खोके खाली उतरवले जात असल्याचे दिसून आल़े त्यांनी चौकशी केली असता, मजूर आणि ट्रकचालक यांनी पळ काढला़ पोलीसांनी ही माहिती धडगाव आणि मोलगी पोलीस ठाण्यात दिली़ या ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, आठ लाख 74 हजार 800 रूपयांचे विदेशी मद्य आढळून आल़े पोलीसांनी हा ट्रक धडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून कारवाई केली़ मुंगल्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला़ कारवाईमुळे खळबळ उडाली आह़े