माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:46 PM2019-07-20T12:46:53+5:302019-07-20T12:46:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट ...

To prevent mother and child death, 12,500 women of the district benefited from mother's death | माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू असून त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा हजार 500 महिलांना मिळाला आहे. या अंतर्गत आतार्पयत जवळपास चार कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.  
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रथमता गर्भवती महिला व स्तनदा पात्र महिलांना  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजारांचा लाभ दिला जातो.
पहिल्या हप्त्यासाठी संबधित लाभार्थी महिला मासिकपाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्यसंस्थेत करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता   प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासून प्राथमिक लसीकरण (तीन महिने) पयर्ंतचे संपूर्ण लसीकरण होते. त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यांनतर लाभार्थींच्या आधारलिंक बँक खात्यात जमा केला जातो.
या योजनेअंतर्गत आतापयर्ंत नंदुरबार जिल्ह्यातील 12 हजार 500 पात्र महिला लाभाथ्र्यांना जवळपास तीन कोटी 95 लाख रुपये अनुदान ऑनलाईन डीबीटी पद्धतीने थेट लाभाथ्र्याच्या खात्यात वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरीत लाभाथ्र्यांनादेखील लाभ मिळावा यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय  अधिकारी तसेच तालुका समुह संघटक, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.
सर्व पात्र प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचा:यांकडे त्वरीत नोंदणी करावी व जास्तीत जास्त     लाभाथ्र्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.    
 

Web Title: To prevent mother and child death, 12,500 women of the district benefited from mother's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.