पशुगणनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:51 AM2019-02-16T11:51:44+5:302019-02-16T11:51:48+5:30

दुर्गम भागात अडचणी : अनेक ठिकाणी नेटवर्कअभावी कामात अडथळा

The possibility of extension of cattle count | पशुगणनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

पशुगणनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Next


नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाकडून आॅनलाईन पध्दतीने पशुधनाची गणना करण्यात येत आहे़ परंतु दुर्गम भागात यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत़ त्यामुळे पशुगणनेसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ १५ फेब्रुवारीपर्यंत पशुगणना करण्याचे विभागाकडून आदेश देण्यात आले होते़
यंदा पहिल्यांदाच पशुसंवर्धन विभागाकडून देशभरातील पशुगणना एका विशिष्ट अ‍ॅपव्दारे करण्यात येत आहे़ यासाठी जिल्ह्यात १६७ टॅबचे वाटप करण्यात आले आहे़ यासाठी साधारणत: दीडशे प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत़ तसेच ४ ते ५ प्रगणकांमागे एका सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली आहे़ तर पंचायत समितीचे पशुधन अधिकारी स्क्रुटीनी आॅफीसर म्हणून काम बघत आहेत़ अक्कलकुवा व धडगाव सारख्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी पशुगणना करण्यासाठी प्रगणकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे दिलेल्या मुदतीत पशुगणना शक्य नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ दरम्यान, आवश्यकतेनुसार पशुगणनेसाठी वाढीव मुदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार कुटुंबसंख्या ठरवून पशुगणना करण्यात येत आहे़ साधारणत: एका प्रगणकाला साडेचार हजार कुटुंबाच्या पशुगणनेची जबाबदारी देण्यात आली आहे़ यात आवश्यकतेनुसार कुटुंबसंख्या कमी-अधिक करता येणे शक्य असल्याचे सांगण्यात आले़ तसेच दुर्गम, डोंगराळ भागामध्ये एका प्रगणकाला ३ हजारांच्या जवळपास कुटुंबसंख्या देण्यात आलेली आहे़ दुर्गम भाग असल्याने पशुगणनेसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तसेच यंदाची पशुगणना एका विशिष्ट अ‍ॅपव्दारे आॅनलाईन पध्दतीने करण्यात येत असल्याने अनेक वेळा ‘कनेक्टिव्हीटी’अभावी इंटरनेटला अडचणी येत असल्याचे प्रगणकांकडून सांगण्यात आले आहे़
पशुगणनेतील आकडेमोडीत कर्मचाऱ्यांकडून होणाºया चुका टाळण्यासाठी तसेच पेपरलेस व्यवहार करण्यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यात अ‍ॅपव्दारे पशुगणना करुन पशुसंवर्धन विभाग ‘डिजीटलायझेशन’च्या दिशेने वळत आहे़ अशा प्रकारे पशुगणना केल्यास कामात अधिक पारदर्शकता तसेच सुसूत्रता येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ़ के़टी़ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
दरम्यान, विभागातील चार कर्मचाºयांना यासाठी पुणे येथे प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते़ तेथे त्यांना या अ‍ॅपची माहिती देण्यात आली़ तसेच अ‍ॅपव्दारे कशा प्रकारे पशुगणना करण्यात येते, जनावरांच्या प्रकारानुसार त्यांची अ‍ॅपवर नोंद कशी करावी आदी विविध प्रकारची माहिती या कर्मचाºयांना मास्टर ट्रेनरकडून देण्यात आली आहे़ या अ‍ॅपव्दारे कर्मचाºयांचे कागदोपत्री जाचही बºयाच प्रमाणात कमी झाले आहेत़
दरम्यान, प्रत्येक तालुक्याला प्रगणक नेमण्यात आले असून नवापूर २३, नंदुरबार २२, तळोदा १०, अक्कलकुवा २३, शहादा ३३ तर धडगावात १८ प्रगणक नेमण्यात आलेले आहेत़ यात नगरपलिकेचे वेगळे प्रगणक असल्याने हा आकडा साधारणत: दोनशेपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले़
दरम्यान, प्रगणकांनी टॅबव्दारे केलेल्या पशुगणनेची सर्व आकडेवारी ही नियुक्त केलेल्या सुपरवायझर यांच्यामार्फत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे येत असते़ संबंधित पशुधन विकास अधिकाºयांकडून उपलब्ध असलेल्या सर्व माहितीची पडताळणी करण्यात येत असून त्यानंतर ती केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला पाठविण्यात येत असते़
प्रगणक, सुपरवायझर तसेच पशुधन विकास अधिकारी यांना या कामासाठी स्वतंत्रपणे युझर आयडी देण्यात आलेला आहे़ त्याव्दारे गाव, तालुका व जिल्ह्याची पशुधनाची आकडेवारी उपलब्ध होत असते़ यंदा प्रथमच आॅनलाईन पध्दतीने पशुधनाची गणना करण्यात येत असल्याने यासाठी संबंधित सर्व कर्मचाºयांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते़ त्यामुळे या कामात आता अडथळा येत नसल्याचे प्रगणकांकडून सांगण्यात आले़

Web Title: The possibility of extension of cattle count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.