अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप : नंदुरबार पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:27 PM2018-02-24T12:27:00+5:302018-02-24T12:27:00+5:30

Opposition on budget provisions: Nandurbar Municipality | अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप : नंदुरबार पालिका

अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप : नंदुरबार पालिका

Next


ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : पालिकेचा कुठलीही कर व दरवाढ नसलेला व 10 लाख 86 हजार 786 रुपये शिल्लक असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत मंजुर करण्यात आला. दरम्यान, अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर न करताच सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आल्याच्या मुद्दयावर विरोधकांनी आक्षेप घेतला.
नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. उपनगराध्यक्षा शोभा मोरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. यावेळी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अजेंडय़ावर एकुण 11 विषय होते. सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
मंजुर करण्यात आलेल्या विषयांमध्ये टोकरतलाव ते नंदुरबार दरम्यान 450 मि.मी.व्यासाची पाईपलाईन टाकण्याची दिशा बदलल्याने उर्वरित कामासाठी पालिकेकडे शिल्लक असलेले 400 मि.मी.व्यासाचे एमएस पाईप वापरणे व जादा खर्चास मंजुरी देण्यात आली. कामनाथ रोडवरील नवीन बुस्टर पंप उभारणे व त्यासाठी उच्च दाबाची वीज वाहणी टाकण्यासाठी पाच लाख तीन हजार 17 रुपयांच्या अंदाजपत्रकास कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली. शिवाय जनरेटर संच खरेदीलाही मान्यता देण्यात आली. ओपन जिमचे साहित्य पुरवठा करून बसविण्यासाठी निविदाधारक अरिहंत इंडस्ट्रियल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या निविदेस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. दैनंदिन व आठवडे बाजार तसेच रस्ते आणि खुल्या जागेत व्यवसाय करणा:यांकडून कर, भाडे फी वसुलीचा ठेक्यासाठी अभिकर्ता नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीर वास्तुचा व प्रेक्षकांचा वार्षिक अपघाती विमा नुतनीकरण करण्यासाठीच्या 67 हजार 300 रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे करण्यासाठी अभिकर्ता नियुक्त करणे व त्याकामी येणा:या खर्चास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, सुरुवातीला दिवंगत नगरसेवक व भाजपचे प्रतोद प्रविण चौधरी व इतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विरोधकांचा आक्षेप
स्थायी समिती सभेत मंजुरी न घेताच थेट सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा आरोप विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी केला. विरोधकांच्या काही शिफारशी देखील त्यात स्विकारण्यात येवून नव्याने अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी करण्यात आली.
शिफारशींमध्ये विस्तारीत पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्याचे पालिकेने शासनास व जनतेला सांगितले आहे. असे असतांना पाईपलाईनचा जादा खर्च आणि दिशा बदलल्याचा खर्च कसा झाला. पाईप कसे शिल्लक राहिले असा प्रश्न उपस्थित करून जादा खर्चास विरोध दर्शविला आहे. लेखा परिक्षणात अनियमितता व वसुलीची शिफारस परिक्षकांनी केली असल्यामुळे विषयास मंजुरी न देण्याची मागणी केली आहे. बुस्टरपंपाचे काम झाले असल्यास नव्याने जादा खर्च कसा झाला याची चौकशी करावी.
ओपन जिमसाठी अज्ञात दानशूर व्यक्तींनी साहित्य पुरविले असून त्यांचा शोध घेवून सत्कार करून आभाराचा ठराव करावा व जादा खर्च मंजुर करू नये. कार्योत्तर मंजुरी नियमाकुल होत नाही असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. नाटय़गृह ज्यांनी कराराने चालविण्यास घेतले आहे त्यांनी विमा व इतर बाबींचा खर्च करावा. पालिकेच्या माथी मारू नये. स्वच्छ नंदुरबारसाठी लोक सहभाग व विद्यमान नगरसेवक यांच्या समन्वयातून स्वच्छता विषयक समिती स्थापन करावी अशी मागणी देखील त्यात करण्यात आली आहे.

Web Title: Opposition on budget provisions: Nandurbar Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.