भरधाव ट्रकची रिक्षाला धडक युवक ठार, एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:49 PM2017-09-23T12:49:25+5:302017-09-23T12:49:25+5:30

महामार्गावरील रायंगणनजीकची घटना

One person was injured in a truck rickshaw kills and killed one | भरधाव ट्रकची रिक्षाला धडक युवक ठार, एकजण जखमी

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक युवक ठार, एकजण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : भरधाव ट्रकने दूध वाहतूक करणा:या रिक्षाला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुस:या जखमी युवकावर व्यारा येथे उपचार सुरू आहेत. पहाटे साडेचार वाजता रायंगणनजीक ही घटना घडली. दरम्यान, वडिलांच्या व्यवसायात मदत करणा:या एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने नवापूरच्या पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे.
पंकज रवींद्र पाटील (24) असे मयताचे नाव असून अशोक गोहिल असे जखमीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 रोजी पहाटे साडेचार  ते पाच वाजेच्या दरम्यान सुरत-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर रायंगण गावाच्या शिवारात ओम साई हॉटेल जवळ हा अपघात झाला. नवापुरहुन विसवाडी येथे दुध घेण्यासाठी जात असलेल्या रिक्षाला समोरुन येणा:या मालट्रकने  जबर ठोस दिली. त्यात बसलेले पंकज रवींद्र पाटील व अशोक गोहील रा. शास्त्रीनगर, नवापुर हे गंभीर जखमी झाले होते. जखमीना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पंकज पाटील यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेत असतांना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गुमान पाडवी तपास     करीत आहे. अशोक गोहील    यांच्यावर व्यारा येथे उपचार सुरु आहेत.
पाटील कुटूंबियांमध्ये पंकज हा एकुलता एक होता. पदवीचे शिक्षण जेमतेम पुर्ण करुन वडीलास मदत म्हणुन तो गोहील यांच्या खाजगी दुध ड़ेअरीवर कामाला लागला होता. रोज पहाट रिक्षाने विसवाडीला जाऊन दुध आणणे व त्यानंतर डेअरी वरील नित्याची कामे करणे अशी त्याची दिनचर्या होती. शांत व संयमी स्वभावाचा मुलगा हरपल्याने शास्त्रीनगर परिसर व पंकज च्या कुटुंबात एकच शोककळा पसरली आहे.
 

Web Title: One person was injured in a truck rickshaw kills and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.