निवडणूकीसाठी ‘आयात’ करावे लागणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:41 PM2019-07-22T12:41:51+5:302019-07-22T12:41:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी काळात होणा:या निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नसल्याने जिल्ह्याबाहेरुन अधिकारी आयात ...

The officer will have to 'import' for the election | निवडणूकीसाठी ‘आयात’ करावे लागणार अधिकारी

निवडणूकीसाठी ‘आयात’ करावे लागणार अधिकारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी काळात होणा:या निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नसल्याने जिल्ह्याबाहेरुन अधिकारी आयात करण्याची वेळ प्रशासनावर येणार आह़े सोबत नायब तहसीलदारांची पदेही रिक्त असल्याने अडचणी कायम राहण्याची चिन्हे आहेत़ 
गेल्या आठवडय़ात जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ़ राजेंद्र भारुड हे बदलून आले आहेत़ त्यांच्या प्रशासकीय बदलीनंतर लागलीच निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यास  शहादा, नवापुर, नंदुरबार, धडगाव, तळोदा आणि अक्कलकुवा पंचायत समितीसाठी स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात येणारे उपजिल्हाधिकारी दर्जाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारीच नसल्याने कामकाज होणार कसे असा प्रश्न आह़े  आजअखेरीस जिल्हा प्रशासनात उपजिल्हाधिकारी दर्जाचे केवळ पाच अधिकारी आहेत़ यात 3 अधिकारी हे जिल्हा मुख्यालयी तर दोघे नेमून दिलेल्या तालुका मुख्यालयात कार्यरत आहेत़ यातच नायब तहसीदारांची पदेही रिक्त असल्याने निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार कसा, असाही प्रश्न आह़े यावर पर्याय म्हणून नजीकच्या जळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातून अधिकारी बोलावून कामकाज पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आह़े जिल्हा परिषद निवडणूकांचा 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणूकांचा 60 दिवसांचा कालावधीही असल्याने पुन्हा ‘ये रे माङया मागल्या’ हीच गत होणार असल्याचे बोलले जात आह़े 
निवडणूक प्रक्रियेदरम्यान अधिका:यांसोबत तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याही बदल्यांची शक्यता असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढण्याची शक्यता आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तहसीलदार पदोन्नतीवर असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आह़े तर शहादा तहसीलदार कार्यालयात नायब तहसीदारांची तब्बल चार पदे रिक्त आहेत़ याठिकाणी महिला नायब तहसीलदार  1 ऑगस्टपासून पदभार घेण्याची चिन्हे आहेत़ अक्कलकुवा येथे नायब तहसीलदारांची दोन पदे रिक्त आहेत़ 

प्रशासनात सध्या निवासी, निवडणूक शाखा, पुरवठा आणि सामान्य प्रशासन असे चारच उपजिल्हाधिकारी आहेत़ तर प्रांताधिकारी साताळकर हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे आहेत़ नंदुरबारच्या प्रांताधिकारी वान्मती सी यांच्या बदलीनंतर साताळकर यांना नंदुरबारचा पदभार दिला गेला आह़े सहायक जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डुडी हे तळोद्यात कार्यरत आहेत़  नियुक्तीवर असलेल्या या  अधिका:यांच्या पदोन्नती बदल्यांचेही वारे अद्याप वाहत असल्याने रिक्त पदांबाबत अस्थितरता कायम आह़े 
 

Web Title: The officer will have to 'import' for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.