नऊ जीवन शाळांचा बालमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:13 PM2019-02-18T12:13:00+5:302019-02-18T12:13:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथे नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविल्या जाणा:या नऊ जीवन शाळांच्या विद्याथ्र्याच्या ...

Nine Life Schools Shake up | नऊ जीवन शाळांचा बालमेळावा

नऊ जीवन शाळांचा बालमेळावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथे नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविल्या जाणा:या नऊ जीवन शाळांच्या विद्याथ्र्याच्या बालमेळावा घेण्यात आला. बालमेळाव्यात विद्याथ्र्यानी उत्साहात सहभागी होऊन प्रत्येक शाळेतील विद्याथ्र्यानी स्पर्धेत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतली.
नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालवल्या जाणा:या महाराष्ट्रातील सात जीवनशाळा डनेल, मणिबेली, थुवानी, साव:यादिगर, त्रिशुल, बाबरी, जीवननगर तसेच मध्य प्रदेशातील दोन जीवनशाळा खा:या बादल, बिताडा व धडगाव येथील शोभा वाघ छात्रालय येथील विद्याथ्र्यानी खो-खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, धावणे, धनुष्यबाणसह समूहगीत, समूहनृत्य, चित्रकला, निबंध स्पर्धा, चित्रप्रदर्शन, साहित्य यासह विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला.
त्याबरोबरच दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. या वेळी वक्तृत्व स्पर्धेत आंदोलनातील अनुभव, माङो स्वप्न, आदिवासी सण उत्सव, पर्यावरणार्थ रक्षण, आदिवासी एकता या विषयावरील भाषणांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
दरम्यान बाल मेळाव्यात जीवनशाळांचे माजी विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू भिमसिंग वसावे, मगन पाडवी, गुलाबसिंग वसावे, खुमानसिंग पटले, आमश्या वसावे, सुनील पावरा यांच्यासह तरूण दाखल झाले असून, विद्याथ्र्याचा स्पर्धेत उत्साह वाढवत आहे. या वेळी माजी विद्याथ्र्यानी आपल्या करियर घडवण्यात मेधा पाटकरांची मोलाची भूमिका असल्याचे सांगतांना मेधा पाटकरांनीच आपणास अंधाराकडून उजेडाकडे मार्गस्थ केल्याचे सांगितले. तसेच विविध स्पर्धेत भाग घेतांना विजय वळवी यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही या माजी विद्याथ्र्यानी सांगितले. बाल मेळाव्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली लतिका राजपूत, चेतन साळवे, गिरधर पावरा, अरसिंग पटले, सियाराम पाडवी, खेमसिंग पावरा परिश्रम घेत आहेत. पंचायत समिती सदस्य कानीबाई पावरा, नाथ्या पावरा, रेहंज्या पावरा, माल्या पावरा, डेमशा पावरा, जेठय़ा पावरा, शिलदार पावरा, चिमा पावरा, वसंत पावरा, जिबान पावरा, रमेश पावरा, मल्या पावरा, लालसिंग पावरा, दुल्लभ पावरा, हिरालाल पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी बालमेळाव्यात आलेल्या विद्याथ्र्याच्या सुविधेसाठी परिश्रम घेतले.
रेवानगर पुनर्वसन येथे सुरू असलेल्या बालमेळाव्यात विद्याथ्र्याची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात येत असून, वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. त्याबरोबरच सिकलसेल तपासणी करून घेण्यात येत आहे. वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सायसिंग पावरा, प्रकाश पाडवी, रेवानगर उपकेंद्राचे डॉ.विशाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक परिश्रम घेत आहे.
लोकशाही की ठोकशाही, शेतक:यांची आत्महत्या की, हत्या आणि पर्यटक या सादर करण्यात आलेल्या नाटकांनीही उपस्थितांची दाद मिळविली. तसेच तंटय़ा भिल, सावित्रीबाई फुले, डॉ.अब्दुल कलाम, शिरीषकुमार, महात्मा गांधी यांच्या जीवनपटावरही विद्याथ्र्याकडून सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Nine Life Schools Shake up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.