नवापूर व नंदुरबारात यंदा प्रथमच अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:48 PM2019-07-22T12:48:01+5:302019-07-22T12:48:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दडी मारणा:या पावसाने शुक्रवारी पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली होती़ ...

Navapur and Nandurbar have recorded the highest rainfall this year | नवापूर व नंदुरबारात यंदा प्रथमच अतिवृष्टीची नोंद

नवापूर व नंदुरबारात यंदा प्रथमच अतिवृष्टीची नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दडी मारणा:या पावसाने शुक्रवारी पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली होती़ शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेर्पयत नंदुरबार आणि नवापुर या दोन तालुक्यात मुसळधार हजेरी लावल्याने यंदांच्या हंगामात प्रथमच अतीवृष्टीची नोंद झाली़ विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावणा:या पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील चार ते पाच गावात घरांचे नुकसान झाल़े   
शनिवारी रात्री 11 वाजेपासून सुरु झालेल्या पावसामुळे नंदुरबार तालुक्यात सैताणे, खर्दे खुर्द, आखातवाडे या गावांमध्ये 15 घरांचे नुकसान झाल़े सकाळी तालुका प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेत पंचनामा केला़ गत दोन दिवसात प्रथम सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारात पाणी साचल्याचे दिसून आले होत़े शनिवारी रात्र ते रविवार पहाटेदरम्यान नंदुरबार तालुक्यात 61, नवापुर 70, शहादा 28, तळोदा 39, अक्कलकुवा 47 तर धडगाव तालुक्यात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े दोन आठवडय़ाच्या खंडानंतर पावसाने हजेरी दिल्याने पिकांवर मर येण्याचे संकट टळले आह़े कापसाला लागवडीनंतर पाणी मिळाल्याने शेतक:यांची चिंता मिटली असल्याचे दिसून आले आह़े रात्री उशिरार्पयत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यासह शहरी भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता़ रविवारी दुपारनंतर ब:याच ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यात कंपनीच्या अधिका:यांना यश आले होत़े पावसामुळे केवळ घरांचे नुकसान झाल्याची माहिती असून अद्याप कोणत्याही प्रकारे जिवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने कळवले आह़े 

शहरातील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे राजेंद्र नथ्थू पाटील यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर वीज कोसळून पाण्याची टाकी फुटली़ वीजेच्या जबरदस्त झटक्यामुळे घरालाही तडे पडल़े विजेची तीव्रता अधिक राहिली असती तर मोठा अनर्थ घडला असता़ दरम्यान याचठिकाणी वाघेश्वरी देवीच्या टेकडाखालची माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून थेट ज्ञानदीप सोसायटीत आल्याने रस्त्यावर एक मीटरपेक्षा अधिक उंचीचा गाळ व मातीचा थर साचला होता़ यामुळे येथील रहिवासी पंडीत सावंत यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळली़ पावसामुळे ठिकठिकाणी दरडही कोसळल्याने या वसाहतीतील रस्ते बंद झाले होत़े सकाळी तालुका प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून पंचनामे करण्यात आल़े कोकणीहिल परिसरातही वीज कोसळल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान येथे कोणत्याही प्रकारे जिवित किंवा वित्त हानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े पावसामुळे दुधाळे शिवारासह विविध भागात पाणी साचून होत़े यंदाच्या हंगामात प्रथमच अतीवृष्टी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होत़े पावसामुळे नियोजित तालुका क्रीडा संकुल, करण चौफुली यासह विविध उंचसखल भागात पाणी साचून होत़े 

पावसामुळे आखातवाडे येथे पाच घरांचे नुकसान झाल़े सैताणे येथील वारु चैत्राम भिल, साहेबराव नामदेव पाटील, सिंदुबाई अजरुन पाटील यांची  पडून नुकसान झाल़े कोपर्ली येथे शेतक:याच्या शेतात पाणी घुसून काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े प्रशासनाने त्या-त्या मंडळाचे मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून पंचनामे करुन घेतले आह़े तालुका प्रशासनाकडून दिवसभर नुकसानीचा आढावा घेण्यात आला़ 
 

Web Title: Navapur and Nandurbar have recorded the highest rainfall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.