नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:41 PM2018-02-17T12:41:02+5:302018-02-17T12:43:33+5:30

Narmada Jeevan school's child festival begins | नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात

नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात

Next
ठळक मुद्दे18 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता समारोप वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदा काठावर नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सुरू असलेल्या नऊ जीवनशाळांच्या बालमहोत्सवाला शुक्रवारपासून जावदे पुनर्वसन वसाहत, ता.शहादा येथे सुरुवात झाली आहे. या शाळांतील 700 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत.
या बालमहोत्सवाचे उद्घाटन छत्तीसगडमधील गांधीवादी कार्यकर्ते हिमांशूकुमार, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजी क्रीडामंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, ऊर्जा विशेषज्ञ प्रा.संजय मं.गो., सुनीती, हिमशी सिंह, मीना नाईक यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलताना हिमांशूकुमार यांनी सांगितले की, जल, जमीन आणि जंगल हे ख:या अर्थाने आदिवासींनीच राखले असून त्यावर त्यांचाच अधिकार आहे. विकासाच्या नावावर देशात आदिवासींना देशोधडीला लावण्याचा प्रकार सुरू आहे ही बाब चुकीची आहे. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जीवनशाळांच्या उपक्रमासंदर्भात माहिती दिली. गेल्या 20 वर्षापासून नर्मदा काठावरील लोकच या जीवनशाळा चालवीत आहेत. गावातील लोकांना कुठल्या प्रकारचे शिक्षण हवे, त्याचे स्वरुप कसे असावे ते ठरविण्याचा अधिकार गावक:यांना असावा, असे त्यांनी सांगितले.
अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी जीवनशाळा या ख:या अर्थाने नर्मदा बचाव आंदोलनाची ओळख असून आदिवासींचे ते खरे भविष्य आहे. त्यातूनच आदिवासी विद्याथ्र्याचे भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले.
पहिल्या दिवशी उद्घाटनीय सत्रानंतर कबड्डी, खो-खो, तिरकामठा याबरोबरच वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धाही झाल्या. त्यात जीवनशाळांतील विद्याथ्र्यानी आपले नैपुण्य दाखवले. याठिकाणी विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. ढोल-ताशांच्या निनादात या स्पर्धा उत्साहात सुरू आहेत. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाला. दरम्यान, या मेळाव्याचा 18 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे.

Web Title: Narmada Jeevan school's child festival begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.