नंदुरबारातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:26 AM2018-08-21T11:26:23+5:302018-08-21T11:26:30+5:30

‘विरचक’मध्ये 37 टक्के पाणीसाठा : गेल्या आठवडय़ातील अतीवृष्टीचा परिणाम

Nandurbar water cut shortage crisis | नंदुरबारातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

नंदुरबारातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

Next

नंदुरबार : शिवण नदीच्या उगम क्षेत्रात गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट 19 टक्क्यांनी वाढली आहे. सद्य स्थितीत प्रकल्पात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजूनही शिवण नदीचा प्रवाह आणि नदीला येवून मिळणा:या विविध नाल्यांचा प्रवाह सुरूच असल्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. यामुळे नंदुरबारकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे. 
पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी विरचक प्रकल्पातील पाणी पातळीत थेंबभरही वाढ झालेली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठा कमालीचा घडला होता. 15 ऑगस्टर्पयत केवळ 19 टक्के पाणीसाठा होता. उपयुक्त पाणी साठय़ाची टक्केवारी केवळ 12 टक्के होती. त्यामुळे पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. येत्या 1 सप्टेंबरपासून पाणी कपातीचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने ठरविलेही होते. परंतु नंदुरबारकरांच्या सुदैवाने गेल्या आठवडय़ात शिवण नदीच्या उगम क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे संकट तुर्तास टळले आहे.
पाणीसाठा 37 टक्क्यांवर
विरचक प्रकल्पात सद्य स्थितीत 37 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता आणखी दोन दिवसात साठा 40 टक्केपेक्षा अधीक जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात पाणीसाठा 34 टक्केर्पयत होता. सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस यामुळे धरणातील पाणीसाठा 70 टक्केपेक्षा अधीक गेला होता. यंदा देखील सप्टेंबर आणि परतीचा पाऊस चांगला झाला तर पाणीसाठा गेल्यावर्षाइतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी पालिकेने पाणी कपातीचा विषय बाजुला ठेवला असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितले.
पाण्याची वेळ जैसेथे 
पाणी पुरवठय़ाची सध्याची वेळ कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येतो. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आणि योग्य आहे. 1 सप्टेंबरपासून किमान 20 ते 25 मिनिटांनी पाणी पुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले असते. पावसाळ्यात ही स्थिती राहिली असती तर हिवाळा आणि उन्हाळ्यातील स्थिती आणखी त्रासदायक राहिली असती. सुदैवाने नंदुरबारकरांवरील हे संकट तुर्तास टळले आहे.
पदाधिकारी, अधिका:यांकडून पहाणी
विरचक प्रकल्पातील वाढलेला पाणीसाठय़ाची पहाणी पालिकेच्या पदाधिका:यांनी व अधिका:यांनी केली. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार नदीचा प्रवाह आणखी आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळ आणि दीड ते दोन फुटांनी वाढणार आहे. अर्थात याच गतीने नदीतील पाणी वाहत राहिल्यास प्रकल्पातील पाणीसाठा 40 टक्केपेक्षा अधीक जाणार आहे.
तीन वर्षापूर्वी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण पावसाळा संपुनही विरचक प्रकल्पात एक टक्काही पाणी पातळी वाढली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने प्रकल्पाला जिवदान दिले होते. परतीचा पाऊस दोन दिवसातच सरासरीचा 20 ते 25 टक्के पडून गेल्याने विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट आठ टक्क्यावरून 41 टक्क्यांवर गेली होती. पाणी टंचाईचे टळलेल्या संकटामुळे त्यावेळी पालिकेने पालिका कार्यालयातच सार्वजनिक सत्यनारायण पुजेचेही आयोजन केले होते. ती आठवण यावेळी पुन्हा आली.
आंबेबाराही भरण्याच्या मार्गावर
नंदुरबार शहराला आंबेबारा प्रकल्पातून देखील पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात देखील केवळ 20 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठवडय़ातील पावसामुळे हा प्रकल्पही 60 टक्केपेक्षा अधीक भरला आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस राहिल्यास हा प्रकल्प दरवर्षाप्रमाणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षीत केला जातो. तेथून नदीद्वारे पाणी आणून ते आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून तेथून ते पाईपलाईनीने शहरात आणले जाते. हा प्रकल्पही पुर्णपणे भरत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
 

Web Title: Nandurbar water cut shortage crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.