बाजारपेठेअभावी नंदुरबारातील हळद उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:03 PM2018-05-19T13:03:53+5:302018-05-19T13:03:53+5:30

Nandurbar turmeric producer due to lack of markets | बाजारपेठेअभावी नंदुरबारातील हळद उत्पादक संकटात

बाजारपेठेअभावी नंदुरबारातील हळद उत्पादक संकटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात हळदीचे लागवड क्षेत्र वाढीस लागून शेतक:यांना आर्थिक सुबत्तेचा नवीन मार्ग हाती लागला होता़ मात्र हा मार्ग अडथळ्यांचा ठरत असून उत्पादित केलेल्या हळदीची विक्री करण्यासाठी बाजारपेठच नसल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत़ यातही कृषी विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़  
मे महिन्यापासून सुरू होणा:या हळद लागवडीनंतर त्याचे संगोपन करून दुस:या वर्षाच्या एप्रिल महिन्यात उत्पादन घेणे शक्य होत असल्याने जिल्ह्यातील अनेकांनी हळद लागवडीचा प्रयोग करून पाहिले होत़े यात बहुतांश शेतक:यांना यशही आले होत़े उत्पादन घेतल्यानंतर शेतक:यांना खरीप हंगामापूर्वी शेत मोकळे करता येत असल्याने लागवड क्षेत्रात गेल्या तीन वर्षात वाढही झाली होती़ हळद लागवडीमुळे जमिनीची गुणप्रत वाढत असल्याने शेतकरी हळद लागवड करत होत़े मात्र उत्पादित केलेली हळद विक्रीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि पुणे येथील बाजारपेठ गाठावी लागत असल्याने शेतक:यांचे नफ्याचे गणित चुकत होत़े यातून यंदा हळद उत्पादनाबाबत शेतक:यांमध्ये उदासीनता आह़े
गेल्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील केवळ 55 शेतक:यांनी हळद उत्पादन घेतल्याची माहिती असून या शेतक:यांना बाजारपेठ न मिळाल्याने येत्या काळात यात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े शेतक:यांचे होणारे हाल लक्षात घेता, प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्ह्यातच हळद खरेदी केंद्रांची निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े अनुदानित मसाला पीक असल्याने कृषी विभागाकडून हळद उत्पादकांना बॉयलर खरेदीसाठी हेक्टरी 12 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती़ गेल्या 2017-18 च्या खरीप हंगामात जिल्ह्यात 73 हेक्टर हळद लागवड करण्यात आली होती़ 2016-17 मध्ये 70 हेक्टर तर त्यापूर्वी 2015-16 मध्ये 55 हेक्टर क्षेत्रात हळद लागवड करण्यात आली होती़ या लागवडीसाठी शेतक:यांना एकरी 60 हजार ते एक लाख रुपयांर्पयत खर्च आला होता़ या तुलनेने उत्पादन हे हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा अधिक येणार असल्याने शेतक:यांनी या पिकात आर्थिक गुंतवणूक केली होती़ यात काही शेतक:यांना उत्पादन चांगले आले होत़े परंतु नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत हळद खरेदी करणारे व्यापारीच नसल्याने शेतक:यांना पश्चिम महाराष्ट्रातील बाजारात संपर्क करून हळद विक्री करावी लागली़ यात वाहतूक खर्च जास्त आल्याने अनेक शेतक:यांनी यंदापासून हळद लागवडीपेक्षा इतर पीक घेण्याबाबत अनुकूलता दर्शवली आह़े गेल्या दोन वर्षात कृषी विभागाने बॉयलर खरेदीसाठी निधीही दिला नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े  
यंदा हळद पिकावर करपा नावाचा आजार आल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े यातून उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट आली होती़ यातही कृषी विभागाने बॉयलर खरेदीसाठी मदत न केल्याने शेतक:यांना भाडय़ाने बॉयलर आणावे लागले होत़े 
 

Web Title: Nandurbar turmeric producer due to lack of markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.