लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सेस फंडाचा निधी  वळविताना भेदभाव होत असल्याच्या वादातून पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी प्रचंड गदारोळ झाला़ विद्यमान सभापती रंजना नाईक व माजी सभापती अर्चना गावीत यांच्या शाब्दिक चकमक झाली़
पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बुधवारी सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर उपसभापती ज्योती पाटील,  गटविकास अधिकारी उदय  कुसुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पोतदार, ग्रामपंचायत विभागाचे अनिल बि:हाडे आदी उपस्थित होते. 
सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर असलेल्या विषय क्रमांक 6 वरील  बांधकाम विभागाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सेसअंतर्गत कामांना मंजुरी देण्याच्या विषय समोर आला़ तेव्हा विरोधी सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. याविषयावरून सुमारे अर्धा तास गदारोळ चालला.  गदारोळात सभापती रंजना नाईक व माजी सभापती अर्चना गावीत यांचात शाब्दिक चकमकी झडल्या.
.तर जिल्हाधिका:यांकडे तक्रार करणार 
विकास कामे करीत असताना सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव करू नये अन्यथा आपण जिल्हाधिका:यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे अर्चना गावीत यांनी सभागृहात  सांगितले. या विषयावरून सभागृहात तब्बल अर्धा तास गदारोळ चालला.  विकास कामांमध्ये कोणावरही अन्याय होऊ नये असे सदस्य रीना गिरासे व  तुषार धामणे यांनी मागणी केली. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावातील आदिवासी मुलांची आश्रमशाळा दुसरीकडे हलविण्यात आलेली आहे त्या ठिकाणी विद्याथ्र्याना सोयीसुविधा व्यवस्थित मिळतात काय ? असा प्रश्न सदस्य देवमन चौरे यांनी करीत त्याठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचे सांगितले. त्यावर आदिवासी विकास विभागाचे डी. डी. नवटे यांनी सांगितले की, संबंधित आश्रमशाळेत सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून पाण्याची व्यवस्था पुरेशी आहे. अगर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेत खातेनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली़