पाणी नमुने गोळा करण्यात नंदुरबार आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:52 PM2019-05-20T12:52:34+5:302019-05-20T12:52:54+5:30

जि़प़ची कामगिरी : जिओफेनसिंग अ‍ॅपव्दारे झाले शंभर टक्के काम

Nandurbar leads to collect water samples | पाणी नमुने गोळा करण्यात नंदुरबार आघाडीवर

पाणी नमुने गोळा करण्यात नंदुरबार आघाडीवर

Next

नंदुरबार : जिओफेनसिंग अ‍ॅपव्दारे पाण्याचे नमुने गोळा करण्यात राज्यात नंदुरबार (१०० टक्के) जिल्हा आघाडीवर आहे़ त्या खालोखाल पालघर व बुलढाणा जिल्ह्यांचे अनुक्रमे ९५ व ९१ टक्के काम पूर्ण होऊन ते दुसऱ्या व तिसºया स्थानावर आहेत़
याबाबत अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून याबाबतची माहिती कळवली आहे़ २०१९-२०२० या वर्षातील मान्सूनपूर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपसणी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते़ याबाबत एमआरएसएसी नागपूर यांच्याकडून जिओफेनसिंग मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करण्यात आले होते़
याचा वापर करुन मान्सूनपूर्व कालावधीत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे व स्त्रोतांचे रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने गोहा करण्याचे काम सुरु करण्याबाबत व ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार एमआरएसएसी नागपूर यांच्या संकेतस्थळाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ मार्च ते ७ मे २०१९ या कालावधीत राज्यामध्ये २ लाख ६९ हजार १४७ स्त्रोतांपैकी १ लाख ४७ हजार २७४ म्हणजे जवळपास ५४.६९ टक्के स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़
यात सर्वाधिक जास्त म्हणजे शंभर टक्के पाणी नमुने गोळा करण्याचे काम नंदुरबार जिल्ह्याकडून पूर्ण करण्यात आले़ तर, पालघर व बुलढाणा अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानावर आहेत़ त्या खालोखाल धुळे, यवतमाळ, अमरावती, सांगली, वाशिम, वर्धा व नाशिक अदी जिल्हे पहिल्या दहा जिल्ह्यांच्या क्रमवारीत आहेत़ पुणे, नागरपूर, भंडारा, कोल्हापूर, लातूर, साताराव जळगाव या ७ जिल्ह्यांमध्येदेखील राज्यात झालेल्या कामाच्या सरासरीपेक्षा जास्त स्त्रोताचे पाणी जिओफेनसिंग अ‍ॅपव्दारे नोंदीत होऊन गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणत आली आहे़

Web Title: Nandurbar leads to collect water samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.