नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नंदुरबारला सर्वाधिक 16 अजर्, नवापूरात 10 तर तळोद्यात सात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:35 PM2017-11-25T12:35:29+5:302017-11-25T12:37:36+5:30

Nandurbar has 16 forms for municipal elections, 10 new seats in municipal elections and seven applications in taloda | नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नंदुरबारला सर्वाधिक 16 अजर्, नवापूरात 10 तर तळोद्यात सात अर्ज

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नंदुरबारला सर्वाधिक 16 अजर्, नवापूरात 10 तर तळोद्यात सात अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांच्या थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीत नंदुरबार व तळोद्यात काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ सामना होणार असून नवापूरात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर नंदुरबारात एकुण 16, नवापूरात 10 तर तळोदा पालिकेत सात जणांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, शनिवारी 25 रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिन्ही पालिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर इच्छूकांनी अर्ज दाखल केले. सर्वच प्रमुख पक्षांसह इतर लहान, मोठे पक्ष आणि अपक्षांचा देखील मोठा भरणा आहे. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
नंदुरबारात सरळ 
लढतीची शक्यता
नंदुरबार पालिकेत एकुण 16 अर्ज दाखल झाले असले तरी खरी लढत काँग्रेसच्या र}ा चंद्रकांत रघुवंशी व भाजपचे डॉ.रवींद्र मराठे यांच्यात होण्याची शक्यता आहे. गुरुवारी काँग्रेसच्या र}ा रघुवंशी, राम रघुवंशी यांच्यासह अपक्ष म्हणून प्रकाश भोई व राकेश मराठे यांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी भाजपतर्फे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय समाजवादी पक्षातर्फे फकिर दिलावरशाह कादरशाह, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुष्पा प्रवीण थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेख अरिफ कमर  तर एमआयएमतर्फे शेख रफअत हुसेन सदाकत हुसेन यांचा समावेश आहे. याशिवाय पाच अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. माघारीच्या शेवटच्या क्षणार्पयत कोण काय निर्णय घेतो यावर देखील बरेच काही अवलंबून राहणार आहे.
नवापूरात तिरंगी 
सामना रंगण्याची शक्यता 
नवापूरात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा सामना होणार आहे. काँग्रेसतर्फे तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात दिपीका हेमंत पाटील, शाह सुरैबा फारूक व हेमलता अजय पाटील यांचा समावेश आहे. यापैकी कुणाला उमेदवारी निश्चित होते  याकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना वळवी यांनी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपतर्फे ज्योती दिपचंद जयस्वाल व शैला भिकाजी टेंभे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, याशिवाय नवापूर विकास आघाडीतर्फे सोनल धर्मेद्र पाटील, समाजवादी पक्षातर्फे शेख अज्मीना जावेद व बहुजन समाज पार्टीतर्फे संगिता सावरे यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे. 
तळोद्यात काँग्रेस-भाजप 
आमने सामने
तळोद्यात काँग्रेस व भाजप अशी सरळ लढत राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे भरत माळी व रोहित भरत माळी यांनी आज तर जितेंद्र सूर्यवंशी यांनी काल अर्ज दाखल केले आहेत. भाजपतर्फे अजय परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देवेश जोहरी यांनी अर्ज दाखल केले आहेत. भरत माळी व अजय परदेशी यांच्यातच खरा सामना रंगणार आहे.
शनिवार, 25 रोजी तळोदा, नवापूर व नंदुरबार येथील तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल अर्जाची छाननी होणार आहे. 30 नोव्हेंबर्पयत माघारीची मुदत आहे. त्यामुळे त्याच दिवशी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
 

Web Title: Nandurbar has 16 forms for municipal elections, 10 new seats in municipal elections and seven applications in taloda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.