नंदुरबार जिल्ह्यात 890 व्हीसीडीसी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:43 PM2018-07-19T12:43:59+5:302018-07-19T12:44:13+5:30

अंगणवाडीअंतर्गत केंद्र राहणार : अडीच हजार बालकांचा समावेशचा दावा

Nandurbar district has started 890 VCDC centers | नंदुरबार जिल्ह्यात 890 व्हीसीडीसी केंद्र सुरू

नंदुरबार जिल्ह्यात 890 व्हीसीडीसी केंद्र सुरू

Next

नंदुरबार : तीव्र कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात 890 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार 461 तीव्र कुपोषीत बालकांना या केंद्रात सामावण्यात आले आहे. त्यासाठी एका बालकावर दिवसाला 75 रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. दुस:या टप्प्यात आणखी किमान 1144 त्यात  बालविकास केंद्र सुरू होणार     आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्हाभरात विशेषत: दुर्गम भागात ग्राम बालविकास केंद्र सुरू करून त्याद्वारे कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रय} करण्यात येणार आहे. पावसाळ्यात दुर्गम भागात दळणवळणाची समस्या आणि इतर अडचणी लक्षात घेता कुपोषणाचे प्रमाण वाढणे, कुपोषित बालकांची संख्या वाढणे यात होत असतो. कुपोषण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून व्हीसीडीसी केंद्र अर्थात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येत असतात. यंदा पहिल्या टप्प्यात 890 ठिकाणी ते सुरू झाले आहेत. 
2437 अंगणवाडी
जिल्ह्यात 12 अंगणवाडी प्रकल्प आहेत. त्याअंतर्गत दोन हजार 437 अंगणवाडी चालविल्या जातात. अंगणवाडीअंतर्गतच ग्राम बालविकास केंद्र अर्थात व्हीसीडीसी सुरू करण्यात येणार आहे. 
केंद्रनिहाय अंगणवाडय़ा पुढील प्रमाणे: नवापूर 347, नंदुरबार 246, रनाळा 156, शहादा 188, म्हसावद 266, तळोदा 242, अक्कलकुवा 211, मोलगी 162, पिंपळखूटा 96, धडगाव 213, तोरणमाळ 154, खुंटामोडी केंद्रात 156 अंगणवाडय़ा आहेत.
सध्या 890 सुरू
सद्याच्या स्थितीत जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातर्फे जिल्ह्यात 890 ठिकाणी व्हीसीडीसी सुरू करण्यात आले आहेत. 
त्यात तळोदा प्रकल्पात 173 केंद्रांमध्ये 618 बालके, अक्कलकुवा प्रकल्पात 127 केंद्रांमध्ये 314 बालके, मोलगी प्रकल्पातील 89 केंद्रांमध्ये 207 बालके, पिंपळखुटा केंद्राअंतर्गत 68 केंद्रांमध्ये 184, धडगाव प्रकल्पातील 143 केंद्रांमध्ये 437, तोरणमाळ 134 केंद्रांत 474 तर खुंटामोडी प्रकल्पाअंतर्गत 156 ठिकाणी बालविकास केंद्र सुरू असून त्यात 227 कुपोषित बालकांचा समावेश असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
1144 केंद्रांचे नियोजन
येत्या काळात आणखी एक हजार 144 केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात तीन हजार 720 बालकांना भरती केले जाणार आहे. या केंद्रांमध्ये नवापूर प्रकल्पाअंतर्गत 118 केंद्र व 295 बालके, शहादा प्रकल्पाअंतर्गत 73 केंद्र व 360 बालके, म्हसावद प्रकल्पांतर्गत 110 केंद्र व 593 बालके, तळोदा प्रकल्पाअंतर्गत 173 केंद्र व 618 बालके, अक्कलकुवा प्रकल्पांतर्गत 127 केंद्र व 314 बालके.
 मोलगी प्रकल्पाअंतर्गत 89 केंद्र व 207 बालके, पिंपळखूटा प्रकल्पांतर्गत 68 केंद्र व 184 बालके, धडगाव प्रकल्पाअंतर्गत 143 केंद्र व 437 बालके, तोरणमाळ प्रकल्पाअंतर्गत 137 केंद्र व 485 बालके तर खुंटामोडी प्रकल्पाअंतर्गत 106 व्हीसीडीसी केंद्र व 227 बालकांना त्यात समावेश करण्यात येणार आहे. 
केंद्रात बालकांना सुविधा
ग्राम बालविकास केंद्रात बालके ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेर्पयत अर्थात दिवसातले दहा तास राहणार असल्यामुळे या ठिकाणी बालकांसाठी पाळणा, लहान खेळणी राहणार आहेत. 
अंगणवाडी केंद्राच्या परिसरातच ही बालविकास केंद्र राहणार असल्यामुळे स्वच्छतागृहे आणि पाण्याचेही व्यवस्था अशा ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. दर आठ दिवसांनी या बालकांचे वजन घेतले जाते.
केवळ औपचारिकता नको
ग्राम बालविकास केंद्रांची जिल्ह्यात केवळ औपचारिकता राहू नये. गेल्या काही वर्षातील तो अनुभव आहे. अंगणवाडी केंद्रात दिवसभर बालकांना ठेवले जाते. त्यांचे पोषण किती आणि कसे होते हा संशोधनाचा विषय असतो. परंतु कागदपत्र रंगविले जाऊन सर्वच अलबेल दाखविले जाते.या केंद्रांमध्ये सॅम बालकांना 30 दिवस ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी आठ वाजता आणल्यानंतर सायंकाळी सहा वाजताच      बालकाला घरी नेता येणार आहे. त्यात आहार तज्ज्ञांनी ठरवून    दिल्यानुसार बालकांना विशिष्ट श्रेणीचा आणि कॅलरीचा आहार दिला जाणार आहे.
शिवाय पोषक औषधी पाजली जाणार आहे. आहाराच्या वेळापत्रकानुसार त्या बालकाला आहार पुरविण्यात येणार आहे. महिनाभरात संबंधित बालक सामान्य श्रेणीत आणण्याचा प्रय} या माध्यमातून असेल.
एका बालकावर 75 रुपये खर्च केला जाणार आहे. परिणामी त्याला आणणा:या पालकाला त्याची बुडीत मजुरी किंवा त्याच्या एक वेळच्या जेवणाचा भत्ता दिला जाणार नाही. 
पालकांनी आपल्या गावातील किंवा परिसरातील ग्राम बालविकास केंद्रात बालकाला आणून सोडून द्यायचे व सायंकाळी परत घरी घेऊन जावे लागणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेर्पयत बालक बालविकास केंद्रात राहील.
 

Web Title: Nandurbar district has started 890 VCDC centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.