पोस्टर्स स्पर्धेत मुंबईची बाजी, चेतक फेस्टिव्हल; उद्या पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:53 AM2017-12-11T04:53:53+5:302017-12-11T04:54:00+5:30

राज्य पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिवल समिती, सारंगखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारंगखेडा येथील अश्व यात्रा व इतिहासातील अश्वांचे बलिदान’ या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती.

 Mumbai's betting, Chetak Festival in posters competition; Tomorrow prize distribution | पोस्टर्स स्पर्धेत मुंबईची बाजी, चेतक फेस्टिव्हल; उद्या पुरस्कार वितरण

पोस्टर्स स्पर्धेत मुंबईची बाजी, चेतक फेस्टिव्हल; उद्या पुरस्कार वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिवल समिती, सारंगखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारंगखेडा येथील अश्व यात्रा व इतिहासातील अश्वांचे बलिदान’ या विषयावर राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात मुंबई येथील शुभम शांतीलाल बाविस्कर यांनी प्रथम, जान्हवी भुवनेश्वर तांडेल (पालघर) यांनी द्वितीय, तर उदय अरुण फराट (विहारी, खोपोली) यांनी तृतीय यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिकसह खान्देशातून ३०० कलावंतांचा सहभाग होता. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य अनिल अभंगे यांनी केले.पारितोषिक वितरण सोमवारी सारंगखेडा येथे होणार असून त्यात रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

अन्य विजेते

अजय पांडुरंग विसपुते (पाचोरा, जि़ जळगाव), राजशेखर विठ्ठल भाट (कबनूर, ता़ इचलकरंजी), निरंजन शेलार (जळगाव), वैभव विठ्ठल निर्मल (दहिवली, ता़ चिपळूण), मोहम्मद शकील मोहम्मद शाबान (चोपडा), तर हरुण पटेल (जळगाव), नरेंद्र सरोदे (चिंचपाडा), राकेश दिनेश पाटील (पुणे), जयवंत परसराम तांबारे (नवी मुंबई).
 

Web Title:  Mumbai's betting, Chetak Festival in posters competition; Tomorrow prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई