लाभार्थीचे खोटे प्रस्ताव बनवून गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:45 PM2019-07-22T12:45:49+5:302019-07-22T12:45:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवकाने वैयक्तिक शौचालय बांधकामात लाभार्थीचे खोटे प्रस्ताव तयार करून ...

Misuse of beneficiaries by making beneficiaries false | लाभार्थीचे खोटे प्रस्ताव बनवून गैरव्यवहार

लाभार्थीचे खोटे प्रस्ताव बनवून गैरव्यवहार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेवकाने वैयक्तिक शौचालय बांधकामात लाभार्थीचे खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त करून घेतले. या गैरव्यवहाराची दखल घेत नवापूर पं.स.चे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी तत्कालीन ग्रामसेवक दौलत रतन कोकणी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
तालुक्यातील खडकी येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन 2014 ते 2019 या कालावधीत ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार खडकी येथील सुजित दिनकर गावीत व ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर केली होती. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. वरिष्ठ स्तरावरून याबाबत चौकशीचे आदेश काढण्यात आल्याने तीन लाभार्थीची  चौकशी केली असता त्यात अंकुश देवल्या गावीत यांच्या घराजवळ वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या ठिकाणी सध्या जुने बांधकाम केले. बाथरूम असून वैयक्तीक शौचालय बांधलेले नाही. ग्रामपंचायतीने खोटा प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त केल्याचे सिद्ध होते. हे अनुदान 12 हजार रुपये लाभधारकास मिळालेले असून एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याबाबत जवाब नोंदविला आहे. दुसरा लाभार्थी अमरसिंग देवल्या गावीत यांनी जवाब नोंदविला आहे की, वैयक्तीक शौचालय दोन महिन्यापूर्वी बांधलेले असून वापरात आहे. त्यामुळे आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने 12 हजार रुपयांची रोख रक्कम दिली आहे. प्रत्यक्ष पाहणीअंती जुनेच वैयक्तिक शौचालय बांधकाम असल्याचे दिसते. या अनुदानाचा प्रस्ताव खोटा अहवाल प्राप्त करून घेतला, असे येथे सिद्ध होते. तिसरा लाभार्थी सुरुपसिंग भाऊराव कोकणी यांना विशाल नाईक या मक्तेदाराने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विटा, रेती, पत्रा, दरवाजा दिला असून शौचालय बांधून दिलेले नाही. त्यामुळे खोटा प्रस्ताव सादर करून अनुदान प्राप्त केल्याचे सिद्ध होते. तत्कालीन ग्रामसेवक यांच्याकडे दस्तावेज अद्याप असल्याने अनुदान कधी प्राप्त झाले? त्याची पडताळणी करता आली नाही, असे  चौकशी अहवालात म्हटले आहे
तत्कालीन ग्रामसेवक दौलत रतन कोकणी यांना बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, वैयक्तीक शौचालय बांधकामात वरील लाभार्थीचे  खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान प्राप्त करून घेतल्याचे सिद्ध होते. ही बाब गंभीर स्वरूपाची व कर्तव्यात कसूर करणारी आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपील) 1967 चे कलम तीनचे उल्लंघन केल्याने शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा मागितला आहे. तसेच खुलासा न केल्यास कारवाई       करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीसीत बजावले आहे.
 

Web Title: Misuse of beneficiaries by making beneficiaries false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.