तळोद्यातील आंबा बागा : तुडतुडे व फुलकीडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:10 PM2018-01-21T13:10:36+5:302018-01-21T13:10:43+5:30

Mango plant in Taloda: pestilence and inflorescence | तळोद्यातील आंबा बागा : तुडतुडे व फुलकीडीचा प्रादुर्भाव

तळोद्यातील आंबा बागा : तुडतुडे व फुलकीडीचा प्रादुर्भाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील आंबा बागांना चांगला बहार आला असला तरी, तुडतुडे व फुलकीडीने याला ग्रहण लावले असल्याचे दिसून येत आह़े यंदाचा आंबा बागांमध्ये ब:यापैकी मोहोर आला असल्याने शेतक:यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े परंतु दुसरीकडे कीडीचा प्रादुर्भावाने शेतकरी काहीसे चिंतीतही                     आह़े 
तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या गोपाळपूर,पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन परिसरात आंबा बागांमध्ये चांगला मोहोर आला आह़े त्यामुळे आंबा उत्पादक शेतक:यांकडून यंदाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकत मिळत आहेत़ परंतु गेल्या काही दिवसांमध्ये परिसरात गारठा व ढगाळ  हवामानामुळे आंबा बागांवर तुडतुडे व फुलकीडचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे शेतक:यांकडून कीडनाशक फवारणीदेखील करण्यात येत आह़े 
दरम्यान, तुडतुडे हे करडय़ा रंगाचे पाचराच्या आकाराचे कीटक पालवी तसेच मोहोर यांचा रस शोषण करीत असतात़ तसेच ते आपल्या अंगातून चिकट पदार्थ बाहेर टाकत असतात़ त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो़ 
तर, फुलकीडमुळे आंब्याची कोवळी पाने, मोहोरवरील फुले कुरतळली जात असतात़ त्यामुळे आंबा मोहोर तांबुस होऊन गळून पडत असतो़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेतक:यांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े 
तळोदा तालुका कृषी विभागाकडून परिसरातील आंबा बागांची पाहणी करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे शेतक:यांना कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आह़े 

Web Title: Mango plant in Taloda: pestilence and inflorescence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.