तळोद्यातील आंबा बागांना बुरशीजन्य रोगाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:00 PM2019-02-23T12:00:33+5:302019-02-23T12:01:07+5:30

तळोदा तालुका : ‘भुरी’ रोगाचा प्रादुर्भाव, मोहोराची देठे व फुलांना लागली जाळी

Mango gardens in poultry are affected by fungal diseases | तळोद्यातील आंबा बागांना बुरशीजन्य रोगाची लागण

तळोद्यातील आंबा बागांना बुरशीजन्य रोगाची लागण

Next

रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या परिसरातील आंबा बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ तसेच बुरशीनाशकाची फवारणी केली जात आहे़
तालुक्यातील रांझणी, पाडळपूर, गोपाळपूर, वरपाडा, प्रतापपूर भागात असलेल्या आंबा बागांवर हा प्रादुर्भाव झाला आहे़ गेल्या काही दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान तसेच वातावरणात गारठा राहत होता़ त्यामुळे आंब्यावर तुडतुडे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे़ काही आंबा बागांवर ‘भुरी’ या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे़ भुरी या बुरशीचा ढगाळ व दमट हवामानामुळे झपाट्याने प्रसार होऊन आंबा मोहोराचे देठ, फुले आणि कोवळी फळे यावर बुरशीची जाळी तयार झाल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बुरशीनाशकाची फवारणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे़
दरम्यान, परिसरात आंबा बागांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सातपुडा पायथ्यालगत आपापल्या घराच्या अवतीभोवतीही ग्रामस्थांनी आंब्यांची लागवड केली आहे़ यंदा आंब्यांना भरपूर प्रमाणात मोहोर आले आहेत़
यंदाच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ आंब्याच्या झाडांवरील फळामुळे फांदी वाकू नयेत म्हणून शेतकºयांकडून आतापासून झाडांच्या आजूबाजूस लाकडाच्या सहाय्याने आधार देण्यात आला आहे़ शेतकरी आंबा पिकांच्या संरक्षणावर विशेष लक्ष देत आहे़
गेल्या महिन्यात ढगाळ वातावरण व गारठ्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला़ वेगवान वारेही वाहिल्याने शीघ्रगतीने बागांवर भुरी बुरशीचा प्रादुर्भाव झाला़ आता वातावरण काहीसे निरभ्र तसेच तापतही असल्याने बुरशीनाशकाच्या फवारणीसह भुरी हा रोग आटोक्यात येण्यास मदत होणार आहे़ शेतकºयांनी बुरशीनाशक फवारणी करावी असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे़

Web Title: Mango gardens in poultry are affected by fungal diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.