मंदाणेजवळील अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:10 PM2017-07-25T18:10:37+5:302017-07-25T18:15:53+5:30

दुचाकी व अज्ञात वाहनात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी

mandanaejavalaila-apaghatata-daoghae-thara | मंदाणेजवळील अपघातात दोघे जागीच ठार

मंदाणेजवळील अपघातात दोघे जागीच ठार

Next

ऑनलाईन लोकमत
मंदाणे,जि.नंदुरबार, दि.25 - शहादा तालुक्यातील मंदाणे गावाजवळ अज्ञात वाहनाने समोरून येणा:या दुचाकीला मंगळवारी सकाळी 10.30 वाजता दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आह़े  
बांधकामाचा ठेका घेणारे सुभाष चव्हाण रा़ बंधारा (म़प्र) हे  सकाळी शहाद्याकडून मंदाणे गावाकडे जात होत़े त्यांच्यासोबत रमेश तिरसिंग पावरा रा़खरगोन व दानी खर्डे रा़ राखखेडी (म़प्र) हे दोघे होत़े मंदाणे गावाजवळ आल्यावर त्यांच्या एमपी 46-एम- 7162 या दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली़ या अपघातात रमेश पावरा हे लांबवर फेकले गेले. तर सुभाष चव्हाण आणि दानी खर्डे हे दोघे जागीच ठार झाल़े अपघाताची माहिती असलोद व मंदाणे गावात मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ जखमी  रमेश पावरा याच्या माहितीनंतर दोघा मयतांची ओळख पटली होती़ दोघांचे मृतदेह खाजगी वाहनात टाकून मंदाणे येथे पाठवण्यात आल़े तर जखमी रमेश पावरा यास मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आह़े 

Web Title: mandanaejavalaila-apaghatata-daoghae-thara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.