लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : महावितरणच्या शहादा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या थकबाकीदार कृषिपंपधारकांकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 78 लाख रुपयांची थकबाकी भरण्यात आली आह़े उर्वरीत रक्कम 15 नोव्हेंबर्पयत भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े त्याच प्रमाणे पहिल्या टप्प्यात थकबाकी भरणा:या सुमारे 800 कृषिपंप धारकांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आह़ेगेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकीदारांवर कारवाईचे हत्यार वापरण्यात येत होत़े वर्षानुवर्षे थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणा:या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत होती़ त्यामुळे याचा परिणाम म्हणून शहादा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या कृषिपंपाचे वीज बिल थकबाकीदारांकडून पहिल्या टप्प्यात भरण्यात आले आह़े त्यामुळे महावितरणकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेशहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव हे चार तालुके येतात़ चारही तालुके मिळून 23 हजार 669 इतकी कृषिपंपाची जोडणी आह़े त्यापैकी शहादा एक मध्ये 28 लाख 61 हजार, शहादा दोन मध्ये 29 लाख 8 हजार, धडगाव 8 लाख, तळोदा 7 लाख, अक्कलकुवा येथे 5 लाख 80 हजार असे एकूण सुमारे 78 लाखांची वसुली करण्यात आली आह़े थकबाकीचा हप्ता भरलेल्या सर्व 800 कृषिपंपांची वीजजोडणी पुन्हा सुरळीत करण्याच्या सुचना संबंधित तालुक्याच्या प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, शेतक:यांचा आता महत्वाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे या हंगामतील गहु, हरभरा, रब्बी ज्वारीची पेरणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आह़े यामुळे शेतीच्या कामांमध्ये वेळोवेळी पाण्याची आवश्यकता भासतच असत़े त्यात, वीज बिलाची थकबाकी असलेल्या शेतक:यांच्या कृषिपंपाची वीज ऐन हंगामात कापण्यात येत असल्याने शेतकरीही बेजार झाले होत़े महावितरणच्या कारवाईच्या बडगा हा शमन्याचे नावच घेत नसल्याने अखेरीस संबंधित थकबाकीदारांनी भरणा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु काही शेतक:यांकडून वीज मंडळाच्या आडमुठेपणामुळे या पेरण्या लांबण्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात येत आह़े कृषिपंप बंद असल्याने पाण्याअभावी केळी, पपई ही पीकेही करपत होती़ त्यामुळे शेतकरी पूर्ण हतलब झाले होत़े रब्बी हंगामावर आता शेतक:यांचे लक्ष केन्द्रीत झाले असतांना वीज वितरण कंपनीने थकित बिलांसाठी तगादा लावला आह़े साहजिकच शेतकरी मेटाकुटीला आला असल्याची व्यथा त्यांच्याकडून मांडण्यात येत आह़े शहादा उपविभागातील सर्वाधिक कृषिपंपधारकाचे वीज बिल थकीत आहेत़ त्यामुळे महावितरणकडून ही मोहिम राबविण्यात आली होती़ अद्यापही काही कृषिपंपधारकांकडून थकबाकी भरण्याबाबत पावले उचलण्यात येत नसल्याने येत्या काही दिवसात महावितरण यावर काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आह़े
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.