‘लकी ड्रॉ’ द्वारे नंदुरबारातील 134 शेतक:यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:41 PM2018-03-20T12:41:02+5:302018-03-20T12:41:02+5:30

पशुसंवर्धनतर्फे विविध लाभ : मध्यस्थांना थारा न देण्याचे आवाहन

The 'Lucky Draw' selected 134 farmers from Nandurbar | ‘लकी ड्रॉ’ द्वारे नंदुरबारातील 134 शेतक:यांची निवड

‘लकी ड्रॉ’ द्वारे नंदुरबारातील 134 शेतक:यांची निवड

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 20 :  पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 134 लाभाथ्र्याना लकी ड्रॉ द्वारे सोडत काढून विविध योजनांचे लाभ देण्यात आले. यामुळे मध्यस्थ व दलालांपासून सुटका झाली आहे. यापुढेही  अशाच प्रकारे लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय नावीन्यपुर्ण योजनेअंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्ीना लाभ देण्यात आले. त्यासाठी प्रक्रियेनुसार पात्र शेतक:यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एकापेक्षा जास्त शेतक:यांचे अर्ज आल्याने लकी ड्रॉचा निर्णय घेण्यात आला. जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी असून सदस्य म्हणून आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
योजनेच्या लाभासाठी 49 शेतक:यांना दुधाळ गट वाटप, दहा शेळ्या व एक बोकड गट 62 जणांना वाटप करण्यात आले. 24 जणांना कुक्कुटपालन गट वाटप करण्यात आले. एकुण 135 जणांची ड्रॉद्वारे निवड करण्यात आली.  जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पंचायत समिती सभापती रंजना नाईक, उपसभापती ज्योतीबाई पाटील यांनी सोडत काढली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.डी.पाटील, डॉ.सुजित कोलंगथ, डॉ.एम.ए.सादगिरे, डॉ.निकुंभ, डॉ.राहुल दडस, डॉ.एस.टी.पाटील, अजय बेंद्रे, विलास मोरे, बासनुरे आदी उपस्थित होते.
 

Web Title: The 'Lucky Draw' selected 134 farmers from Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.