प्रकाशा शिवारात बिबटय़ा मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:33 PM2019-07-21T12:33:22+5:302019-07-21T12:33:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जितेंद्र पाटील यांच्या शेतात शनिवारी बिबटय़ा  मृतावस्थेत आढळून आला. त्याला ...

A leopard was found dead in the light of Shiva | प्रकाशा शिवारात बिबटय़ा मृतावस्थेत आढळला

प्रकाशा शिवारात बिबटय़ा मृतावस्थेत आढळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जितेंद्र पाटील यांच्या शेतात शनिवारी बिबटय़ा  मृतावस्थेत आढळून आला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात एकच गर्दी केली होती. वनविभागाने या मृत बिबटय़ाची विल्हेवाट लावली.
 सविस्तर वृत्त असे की, प्रकाशापासून हाकेच्या अंतरावर जितेंद्र भरत पाटील यांच्या शेताच्या बांधावर वाघ झोपला आहे, असे प्रथमदर्शनी दिलीप वळवी यांना जाणवले. त्यांनी शेतमालक जितेंद्र पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन ही माहिती दिली. पाटील हे शेतात आल्यानंतर जवळ जाऊन पाहिले तर बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती शहादा वनविभाग व प्रकाशा दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा:यांना कळवली. वनविभागाच्या कर्मचा:यांनी पाहणी केल्यानंतर अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा मादी बिबटय़ा असून त्याला ब:याच दिवसापासून अन्न न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या कर्मचा:यांनी काढला. पंचनामा झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश देशमुख व डॉ.सागर परदेशी यांनी जागेवरच या बिबटय़ाचे शवविच्छेदन करून नाशिक व हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत व्हीसेरा पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर उपवनसंरक्षक सुरेश कवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक राजेंद्र झगडे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल बाळासाहेब इंदवे, विक्रम पदमोर, अनिल बोरुडे, वनरक्षक बिलाल शहा, सुभाष मुकाळे, प्रवीण वाघ, दीपक परदेशी, कुशल पावरा आदींनी या बिबटय़ाचा अंत्यविधी करून विल्हेवाट लावली. या वेळी जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सचिन चौधरी, पोलीस कर्मचारी गौतम बोराळे, शोएब शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, धुरखेडा रस्त्यावर सचिन सखाराम चौधरी यांच्या शेतातील पाण्याच्या टाकीवर दोन बिबटे व त्याचे दोन बछडे रखवालदाराला आढळून आले. शेतमालक सचिन चौधरी यांनी याबाबत शहादा वनविभाग व प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात कळविले आहे.
 

Web Title: A leopard was found dead in the light of Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.