कोठली गण पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचा निसटता विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:42 PM2017-12-14T17:42:49+5:302017-12-14T17:42:56+5:30

Kothali Gana by-election: BJP candidate's escape | कोठली गण पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचा निसटता विजय

कोठली गण पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचा निसटता विजय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार पंचायत समितीअंतर्गत कोठली गणात भाजपचे दिनेश गोरजी गावीत यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करीत विजय मिळविला. गावीत यांनी गांगुर्डे यांचा 139 मतांनी निसटता पराभव केला.
कोठली पंचायत समिती गणासाठी 13 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या ठिकाणी भाजपतर्फे दिनेश गोरजी गावीत तर काँग्रेसतर्फे राजेश शिवदास गांगुर्डे हे रिंगणात होते. निवडणुकीसाठी 13 रोजी घेण्यात आलेल्या मतदानात एकुण 69.89 टक्के मतदान झाले. मतदानासाठी फुलसरे, उमज येथे दोन, वागशेपा एक, कोठडे येथे दोन, निमगाव येथे दोन, कोठली खुर्द येथे पाच, निंबोणी दोन व धिरजगाव येथे एक मतदान केंद्र होते. एकुण सहा हजार 742 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन हजार 376 पुरुष तर तीन हजार 366 पुरुष मतदारांचा समावेश आहे. टक्केवारीत एकुण 69.89 टक्के मतदान झाले.
मतमोजणी गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात करण्यात आली. त्यासाठी चार टेबल लावण्यात आले होते. अवघ्या 25 मिनिटात निकाल जाहीर करण्यात आला. त्यात दिनेश गोरजी गावीत यांना तीन हजार 332 तर राजेश शिवदास गांगुर्डे यांना तीन हजार 193 मते मिळाली. याशिवाय 217 मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, निवडून आलेल्या सदस्याला अवघ्या एका वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. येत्या नोव्हेंबर 2018 मध्ये पंचायत समितीच्या सध्याच्या पदाधिकारी, सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत फारशी चुरस आणि उत्सूकता नसल्याचे दिसून आले.    
 

Web Title: Kothali Gana by-election: BJP candidate's escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.