In the Indian Tribal Party Rally from Nandurbar Constituency | नंदुरबार मतदारसंघातून भारतीय ट्रायबल पार्टी रिंगणात
नंदुरबार मतदारसंघातून भारतीय ट्रायबल पार्टी रिंगणात

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टीनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून अशोक दौलतसिंग पाडवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
भारतीय ट्रायबल पार्टी राज्यात नऊ ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. त्याबाबत मंगळवारी पार्टीचे पदाधिकारी प्रमोद नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. उमेदवार अशोक पाडवी हे वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथील सरपंच आहेत. गुजरातमधील आमदार महेशभाई वसावा हे पार्टीच्या प्रचारासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Web Title:  In the Indian Tribal Party Rally from Nandurbar Constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.