धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:56 PM2018-05-28T12:56:48+5:302018-05-28T12:56:48+5:30

प्रकाशा बालिका अपहरण : सुरत येथे मुली सापडल्या सुखरूप, आरोपीही जेरबंद

Impression of the walls of religion | धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत

धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 28 : एकीकडे जाती-धर्माचे अवडंबर माजविले जात आहे. त्यातून काही समाजकंटक आपले राजकारण करून पोळी शेकत आहेत. परंतु दुसरीकडे जात-धर्माच्या पलीकडे मानवता आजही कायम असल्याचे उदाहरण प्रकाशा येथील बालिकांच्या अपहरण प्रकरणातून दिसून आले. प्रतिकाशी असलेल्या प्रकाशातून बेपत्ता झालेल्या बालिका सुरत येथील दग्र्याच्या माध्यमातून सापडतात, हा योगायोग घडला तो इम्रान नामक व्यक्तीमुळे. दरम्यान, दोन्ही बालिका सुखरूप सापडल्याने कुटुंबासह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
 प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात झोपडीत राहणारा संपाराम मोजा ठाकरे याच्या वंदना (वय 11 वर्ष) व योगिता (वय 8 वर्ष) या दोन्ही मुली आठवडाभरापूर्वी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. मुलींचा ठिकठिकाणी शोध घेऊनही त्या सापडल्या नसल्यामुळे संपाराम यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दगा महाराज गोशाळेत काम करणारा बबन भीमा पावरा याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. नंदुरबार रस्त्यावर पुलाचे काम करणा:या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यातदेखील तो मुलींना घेऊन जात असताना दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. पोलिसांनी दोन्ही मुलींचे छायाचित्र आणि बबन पावरा याचेही छायाचित्र प्रसिद्ध केले होते. बबनचे मोबाइल लोकेशन देणा:यास पाच हजार, तर त्यांची माहिती देणा:यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जिल्हा पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मीडियातील बातम्या, सामाजिक दबाव यामुळे पोलिसांवरही तपासाचे दडपण दिवसेंदिवस वाढतच होते. 
सुरतकडे रवाना
बबन याने मुलींचे अपहरण करून त्यांना नंदुरबार येथे नेले. तेथून त्याने रेल्वेद्वारे सुरत येथे नेल्याची माहिती मिळाली. सुरत येथे तो मुलींचे काय करणार होता याबाबत माहिती नाही. परंतु चार ते पाच दिवसांपासून तो सुरत येथेच विविध ठिकाणी वास्तव्यास होता हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दग्र्यातील इम्रान झाला देवदूत
इस्लाम धर्मात रमजान महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात जास्तीत जास्त चांगले काम करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. दिवसभर रोजा करून पाच वेळा नमाज पठण करून धार्मिकता पाळली जाते. याच पवित्र रमजान महिन्यात           सुरत येथील ओसांबा परिसरातील दग्र्यातील इम्रान सहा हे संपाराम           ठाकरे यांच्या परिवारासाठी देवदूत म्हणून पुढे आले. बबन ठाकरे हा मुलींना घेऊन ओसांबा परिसरात  फिरत असताना त्यापैकी योगिता या मुलीला शौचासाठी तो घेऊन गेला. दुस:या अर्थात वंदना हिला त्याने दग्र्याजवळ थांबविले. तेथे ती रडत होती. तिला रडताना पाहून दग्र्यातील इम्रान सहा हे तेथे आले. त्यांनी वंदनाला विश्वासात घेऊन रडण्याचे कारण विचारले. 
तिने आई-बाबांकडे जायचे असल्याचे सांगितले. शिवाय भूकदेखील लागल्याचे तिने सांगितले. इम्रान यांनी मुलीला पत्ता विचारला, परंतु केवळ प्रकाशा एवढेच तिला सांगता आले. त्यांच्याजवळील मोबाइल देऊन तिच्या वडिलांचा मोबाइल नंबर लावायला सांगितला. तो तिने बरोबर लावला. इकडे संपाराम यांनी फोन उचलताच योगिता हिने रडत आपल्याला घेण्यास या म्हणून सांगितले.
 मुलीचे बोलणे झाल्यानंतर तिला याबाबत बबन याला काहीच न सांगण्याचे सांगितले. दुसरीकडे बबन हा योगिताला घेऊन आल्यावर इम्रान यांनी तिघांना पोट भरून जेवण देत थांबण्याचा सल्ला दिला. तिघे तेथे थांबला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. 
 

Web Title: Impression of the walls of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.