नवापूरची देशी तूर मिळणार घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:50 PM2018-01-19T12:50:33+5:302018-01-19T12:50:47+5:30

The home of Navapura will get home | नवापूरची देशी तूर मिळणार घरपोच

नवापूरची देशी तूर मिळणार घरपोच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात साधारण 16 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या तूरीचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली आह़े प्रतिक्विंटल साडेपाच हजारपेक्षा अधिक दरांची अपेक्षा असलेल्या तूरीला प्रारंभीच  चार हजार 100 असा दर मिळाला असून पणन महासंघाच्या प्रयत्नाने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीनुसार आता घरपोच तूर मिळणार आह़े  
बुधवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते नंदुरबार येथे नवापुरच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़ बाजारभावानुसार तूर मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आह़े या केंद्रांवर शेतक:यारंचा तूर खरेदी होऊन त्यांची विक्री होणार असल्याने तूर उत्पादकांना दिला मिळाला आह़े यंदा हंगामाच्या प्रारंभीच बाजारात दर कोसळल्याने तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले होत़े खरेदी केंद्रांमुळे त्यांची सोय होणार आह़े कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा उपनिबंधक एस़वाय़पुरी, सहायक निबंधक प्रताप पाडवी, सहायक निबंधक निरज चौधरी, नवापूर शेतकरी संघाचे चेअरमन अजितकुमार नाईक, व्हाईस चेअरमन दिलीपसिंग वसावे, रूस्तुम वसावे आदी उपस्थित होत़े 
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात साधारण 14 हजार 500 हेक्टर्पयत तूरीची लागवड करण्यात येत़े गेल्या दोन वर्षात दाळीचे उत्पादन घटल्याने यंदा शेतक:यांनी वाढीव लागवडीवर भर दिला होता़ यामुळे जिल्ह्यात 16 हजार 809 हेक्टर तूरीची लागवड करण्यात आली होती़ यात सर्वाधिक लागवड ही नवापूर तालुक्यात करण्यात आली होती़ या तूरीचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली असून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत या तूरीला तीन हजार 800 ते चार हजार रूपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहेत़ अद्याप शासनाकडून तूरीला हमीभाव जाहिर नसल्याने आवक तुरळक आह़े 
जिल्ह्यात तूरीच्या वाढत्या क्षेत्राला बळकटी देऊन शेतक:यांना अधिक चांगले दर मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत़ यंदा दरांमध्ये कमी असल्याचे संकेत असल्याने शासनाने नवापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या तांदूळ व तूरदाळ विक्री व्यवसायाला सुरूवात केली आह़े अटल महापणन विकास अभियानांतर्गत शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या मार्फत हे केंद्र सुरू झाले आह़े केंद्रात खुशबू, भोगावती हे तांदूळ आणि नवापुरी तूरदाळीची विक्री करण्यात येणार आह़े या केंद्रातून मिळणारी तूरदाळ आणि तांदूळ याची होमडिलीव्हरी करण्याचा अभिनव उपक्रमही खरेदी केंद्रातर्फे राबवण्यात येणार आह़े पहिल्याच दिवशी नंदुरबार येथील ग्राहकांनी 35 हजार रूपये किमतीच्या दाळ आणि तांदूळाची खरेदी केली़ 

Web Title: The home of Navapura will get home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.