मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:57 PM2019-07-20T12:57:24+5:302019-07-20T12:57:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कन्यादान मंगल कार्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन शिबिराचे ...

Guidance for the menstrual management camp | मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन

मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कन्यादान मंगल कार्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े दोन दिवसीय शिबिरासाठी जिल्ह्यात मार्गदर्शन देण्यासाठी 70 महिलांची निवड करुन त्यांना प्रशिक्षित करण्यात आल़े 
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याहस्ते करण्यात आल़े यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी,  गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सांगली येथील मुख्य प्रशिक्षक शांता वडेर उपस्थित होत्या़ 
कार्यक्रमात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मासिक पाळी संदर्भात अनेक गैरसमज असून आजही अनेक भागात चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो़ यामुळे महिलांच्या आरोग्यवर विपरित परिणाम होतो़ मासिक पाळीच्या काळात महिलांनी योग्य काळजी घेतल्यास कुपोषण, अॅनिमिया सारख्या आजारांना आळा बसेल़ प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला, किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करावी़ 
प्रशिक्षणादरम्यान सांगली येथील प्रशिक्षक शांता वडेर यांनी महिलांना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी संदर्भात निर्माण होणारी आव्हाने व उपाय, घ्यावयाची काळजी, काळजी घेतल्यास न होणारे आजार, व्यवस्थापनाचे फायदे, पद्धती याविषयी मार्गदर्शन केल़े प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी यांनी तर आभार योगेश कोळपकर यांनी मानल़े यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार यांनी परिश्रम घेतल़े 

जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होत़े जिल्हास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील 70 महिलांची मुख्य प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आह़े प्रशिक्षणादरम्यान विविध खेळ, गटचर्चा, व्हिडिओ प्रक्षेपण याद्वारे उपस्थित महिलांना माहिती देण्यात येऊन प्रशिक्षित करण्यात आल़े समारोपवेळी सहभागी महिलांचा गौरव करण्यात आला़ 
 

Web Title: Guidance for the menstrual management camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.