पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:07+5:302021-04-14T04:28:07+5:30

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी ...

Guardian Minister Adv. K. C. Padvi's visit to the district hospital | पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

Next

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के. डी. सातपुते, डॉ. राजेश वसावे, अधिपरिसेविका नीलिमा वसावे आदी उपस्थित होते.

कोरोनाबाधितांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अधिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील सुविधा व गरजांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जंबो कोविड सेंटर उभारण्याची तयारी करावी आणि त्याठिकाणी ऑक्सिजन प्लँटचेदेखील नियोजन करावे, असे ॲड. पाडवी यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी पीपीई कीट घालून कोविड कक्षातील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयात चांगले उपचार होतील. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्‍ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी घेतली कोरोना लसीची दुसरी मात्रा

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णलयात कोरोना लसीची दुसरी मात्रा (डोस) घेतली. परिचारिका सुनयना पाथरे यांनी ही लस दिली. पालकमंत्र्यांनी सुनयना यांना धन्यवाद दिले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून ४५ वर्षांवरील नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रांवर जावून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Guardian Minister Adv. K. C. Padvi's visit to the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.