सुवर्ण बाजाराला आली झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:33 AM2017-09-24T11:33:27+5:302017-09-24T11:33:55+5:30

उत्साह : आदिवासी बांधवांकडून दागिन्यांची खरेदी

 The gold market has flared up | सुवर्ण बाजाराला आली झळाळी

सुवर्ण बाजाराला आली झळाळी

Next
ठळक मुद्देपारंपारिक दागिण्यांना मागणी आदिवासी संस्कृतीमध्ये पारंपारिक दागिण्यांना अधिक मागणी आह़े यात, हातात घालण्यासाठी कड, वेली, वाकडे, गोट, पाटली, बांगडी, गोखरु, हाताचे वाऴे तसेच पायातील दागिण्यांमध्ये शेरीकडे, पायातील वाळे, सारनी़ गळ्यात घालण्यासाठी साखळी, चो


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवरात्रोत्सव तसेच दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर नंदुरबारातील सुवर्ण बाजारदेखील तेजीत असल्याचे चित्र बघायला मिळत आह़े आदिवासी बांधवांकडून पारंपारिक दाग-दागिणे खरेदीला पसंती देण्यात येत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़े
आदिवासी संस्कृतीमध्ये पारंपारिक दागिण्यांना अधिक महत्व देण्यात येत असत़े त्यामुळे साडेतिन मुहूर्तापैकी एक असलेल्या दस:याच्या पाश्र्वभूमिवर आदिवासी बांधवांकडून विशेषत चांदीची अलंकार खरेदी करण्यात येत आह़े सध्या नंदुरबारातील काही भाग वगळता इतर परिसरात पावसाने ब:यापैकी हजेरी लावली आह़े त्यामुळे आता पिक पाणीही चांगल्या स्थितीत आह़े त्यामुळे शेतकरीदेखील समाधानी आहेत़ 
परिणामी दोन पैसे हाती आल्यावर सणासुदीसाठी दागिणे खरेदीसाठी त्यांचा कल दिसून येत आह़े सध्या सोन्या, चांदीचे भावही स्थिर असल्याने याचादेखील फायदा दागिणे खरेदी करताना होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़े
 

Web Title:  The gold market has flared up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.