नंदुरबारातील चार व्यापा:यांना तळोद्यानजीक लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:10 PM2018-11-16T22:10:39+5:302018-11-16T22:10:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : किराणा मालाच्या वसुली करणा:या व्यापा:याचा गाडीच्या पुढे मोटारसायकली उभ्या करून व्यापा:यांना धारधार शस्त्रास्त्र दाखवत ...

Four gangs of Nandurbar were robbed by police | नंदुरबारातील चार व्यापा:यांना तळोद्यानजीक लुटले

नंदुरबारातील चार व्यापा:यांना तळोद्यानजीक लुटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : किराणा मालाच्या वसुली करणा:या व्यापा:याचा गाडीच्या पुढे मोटारसायकली उभ्या करून व्यापा:यांना धारधार शस्त्रास्त्र दाखवत त्यांच्याकडून साधारण चार लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाखांचा मुद्देमाल रस्ता लुटारूंनी चोरल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आमलाड नजीक अंकलेश्वर-ब:हाणपूर मार्गावर घडली. महिनाभरात रस्ता लुटीची सलग तिसरी-चौथी घटना घडल्याने व्यापा:यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, अशा कारवायांवर ठोस कार्यवाही करण्यासाठी शहरातील व्यापा:यांनी उपविभागीय अधिका:यांना साकडे घातले होते.
मिळालेल्या माहिती नुसार नंदुरबार येथील साखरेचे व्यापारी उमेद रूपाचंद जैन, विरलकुमार महावीर जैन, किशोर घेवरचंद ताथेड व पप्पू घेवरचंद जैन हे चार व्यापारी नेहमीप्रमाणे दोन-तीन दिवसानंतर अक्कलकुवा, तळोदा व प्रकाशा येथे विकलेल्या किरणा मालाची वसुलीसाठी किरणा प्रतिष्ठानांवर येत असतात. शुक्रवारी दुपारीदेखील ते नंदुरबारहून आले होते. सुरूवातीला त्यांनी अक्कलकुवा येथून वसुली केली होती. त्यानंतर हे व्यापारी आपल्या गाडीने तळोद्यात आल्यानंतर तळोद्यातील व्यापा:यांकडून वसुली केली. साधारण चार लाख रूपयांची वसुली या व्यापा:यांनी केल्यानंतर ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तळोद्याहून निघाले होते. सदर व्यापा:यांची गाडी आमलाडच्या पुढे लावून गाडी थांबविली. त्यानंतर दबा धरून बसलेले 10 त 12 जण गाडीजवळ आलेत. त्यातील काहींजवळ धा:या, कोयता, तलावरील अशी धारधार शस्त्रे  होती. काहींनी ही धारधार शस्त्रांचा धाक व्यापा:यांना दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग एकाने हिसकावून घेतली. काहींनी मिरचीची पूडदेखील व्यापा:यांच्या डोळ्यात फेकली होती. गाडीचालकावर तलवारीचा वार केल्यामुळे त्याच्या मांडीवर घाव बसून जखमी झाला आहे. एका व्यापा:याच्या गळ्यातील चैन, हातातील ब्रासलेटदेखील हिसाकावून घेतले. रोकड पाच लाख व सोन्याचे वस्तू मिळून साधारण सहा लाखांचा ऐवज या लुटारूंनी लूटून नेल्याचे या व्यापा:यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या लुटारूंनी गाडीवरही दगड फेक केल्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या आहेत.
या रस्ता लुटीप्रकरणी व्यापा:यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तत्पूर्वी हे लुटारू तेथून पसार झाले होते. याबाबत व्यापा:यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा र्पयत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मेढे यांनी स्थानिक पोलीस अधिका:यांसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. व्यापा:यांना लुटण्याची घटना शहरातील व्यापा:यांच्या कर्णोपकर्णी गेल्यानंतर व्यापा:यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिका:यांकडे त्यांनी साकडे घालत अशा सातत्याने घडत असणा:या रस्ता लुटीच्या घटनांवर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. कारण महिनाभरात रस्ता लुटीच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. परंतु लुटारूंचा अद्यापही ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यापा:यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Four gangs of Nandurbar were robbed by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.