जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:11 PM2019-06-17T12:11:56+5:302019-06-17T12:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी ...

Due to water cut, traffic congestion | जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीची कोंडी

जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीची कोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सविस्तर वृत्त असे की, सध्या कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ब्राrाणपुरी येथे रस्ता खोलीकरणासाठी पोकलेन मशीनद्वारे खोलीकरण करण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास ट्रकचे चाक फसल्याने पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्ता रुंदीकरण कामावरील कर्मचारी व ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत केली.
ग्रामस्थ बनले वाहतूक पोलीस
सध्या ब्राrाणपुरी गावात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून ये-जा करणा:या अवजड वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वत: ग्रामस्थ वाहतूक पोलिसांची जबाबदारी पार पाडताना दिसून  येतात.
 

Web Title: Due to water cut, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.