‘एसएमएस’ येत नसल्याने धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:05 PM2019-04-18T12:05:31+5:302019-04-18T12:06:00+5:30

25 टक्के प्रवेश प्रक्रिया : पालकांनी ‘अॅप्लीकेशन व्हाईस डिटेल्स’वर जाऊन तपासावे

Due to lack of SMS, intimidation | ‘एसएमएस’ येत नसल्याने धाकधूक

‘एसएमएस’ येत नसल्याने धाकधूक

Next

नंदुरबार : 25 टक्के मोफत प्रवेश (आरटीई)अंतर्गत सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आह़े या बाबत पहिल्या प्रवेश फेरीतील ऑनलाईन सोडत काढण्यात आली आह़े या सोडतीमध्ये ज्या विद्याथ्र्याचे नावे आले आहे, अशा विद्याथ्र्याच्या पालकांना एसएमएसव्दारे सूचना देण्यात येणार होती़ परंतु बहुतेक पालकांना याबाबत एसएमएस आलेलाच नसल्याने त्यांच्या मनात प्रवेशाबाबत धाकधूक वाढली आह़े 
पुणे येथे आरटीई प्रवेशासाठी पहिली ऑनलाईन सोडत काढण्यात आली़ राज्यभरातील आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या ऑनलाईन अर्जाची ही सोडत होती़ त्यामुळे पहिल्या सोडतीमध्ये जे विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले आहे अशांना शिक्षण विभागाव्दारे एसएमएस पाठविण्यात येणार होता़ 8 एप्रिलला ही सोडत काढण्यात आली़ जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याची निवड यात करण्यात आली आह़े त्यामुळे  साधारणत: 10 एप्रिल नंतर संबंधित पालकांना एसएमएसव्दारे पुढील सूचना मिळणे आवश्यक होत़े परंतु आता जवळपास आठवडा उलटण्यात आला आह़े असे असूनही बहुतेक पालकांना एसएमएस आलेले नसल्याने आपल्या पाल्याच्या पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झालेला आह़े  
पडताळणीसाठी मार्ग नाही
पहिल्या सोडतीत ज्या विद्याथ्र्याचे नाव असेल, त्यांना एसएमएस येणार होता़ त्यामुळे आठवडा उलटूनही एसएमएस येत नसल्याने कदाचित पहिल्या सोडतीमध्ये आपल्या पाल्याचे नाव आले नसल्याचा समज अनेक पालकांनी करुन घेतला असल्याचे समजत़े बर, एसएमएस शिवाय आपल्या पाल्याचे पहिल्या सोडतीमध्ये नाव आलेय की नाही हे पडताळण्याचा दुसरा मार्गही माहिती नसल्याचे अनेक पालकांचे दुखणे आह़े त्यामुळे सध्या पालकांची चांगलीच घालमेल सुरु असल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े 
केवळ 16 जणांचे प्रवेश निश्चित
जिल्ह्यात आरटीईच्या 470 जागांचा कोटा ठरविण्यात आला आह़े जिल्ह्यातील एकूण 47 शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आह़े 470 जागांसाठी जिल्ह्याभरातून केवळ 573 म्हणजे केवळ 103 अजर्च जास्त आले आहेत़ त्यामुळे 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा खुपच मागे असल्याचे यातून दिसून आले आह़े दरम्यान, 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या ऑनलाईन सोडत प्रक्रियेत जिल्ह्यातील 140 विद्याथ्र्याच्या नावाची निश्चिती करण्यात आलेली आह़े संबंधित विद्याथ्र्याचे कागदोपत्री तपासणी होऊन तद्नंतर आता पुढील प्रवेश प्रक्रियेत सामोरे जाण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत़ दरम्यान आता 140 विद्याथ्र्यापैकी आठवडाभरात केवळ 16 विद्याथ्र्यानी आरटीईअंतर्गत आपली प्रवेश निश्चिती केली असल्याची माहिती आह़े तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तीन आकडी विद्याथ्र्याचे प्रवेश झाल्याचे संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीवरुन दिसून येत आह़े दरम्यान, अनेक पालकांना प्रवेशासाठी कागदपत्रे गोळा करतानाही अनेक अडचणी येत आहेत़ सध्या आचारसंहिता सुरु असल्याने साहजिकच शासकीय अधिकारी कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे पालकांची कागदोपत्री बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े पालकांच्या मनातील संभ्रमावस्था दुर करण्यासाठी संबंधित विभागाने मदत केंद्र सुरु करावे अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ‘वजनदार’ पालक आपल्या विद्याथ्र्याचा आरटीईअंतर्गत नंबर लावण्यासाठी शिक्षण विभागात चकरा मारत असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतु 8 एप्रिल रोजी काढण्यात आलेली सोडत प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पध्दतीने पार पडल्याने यासाठी कुठलीही ‘सेटींग’ निरुपयोगी ठरत असल्याचे त्यांना समजवण्यात येत आह़े परंतु तरीही त्यांच्याकडून प्रवेशासाठी आग्रह धरला जात आह़े
 

Web Title: Due to lack of SMS, intimidation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.