दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:22 AM2018-12-11T11:22:17+5:302018-12-11T11:22:24+5:30

सातपुडा परिसर : चाराटंचाई समस्येच्या निराकरणासाठी होताय प्रयत्न

Drought Support | दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

Next

सोमावल :   सातपुडा परिसरात कमी पर्जन्यमानामुळे पिण्याचा पाण्यासह चाराटंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चा:यासाठी गाळपेर जमीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून दुष्काळावर मात करण्यासाठी येथील जलाशयाखालील गाळपेर जमीनीत रब्बी चारा पीक उत्पादनासाठी मशागतीचे काम करीत आहेत़
येथील परिसरात घेतल्या जाणा:या तृणधान्य, कडधान्य, ऊस व तेलबिया पिकाखालील क्षेत्रामुळे मोठय़ा प्रमाणात चारा पशुधनासाठी उपलब्ध होत असतो. येथे उपलब्ध होणारा बहुतेक चारा हा पावसाळ्यात पडणा:या पाण्यावर अवलंबून             असतो. मात्र मागील 4 ते 5 वर्षाच्या कालावधीपासून येथील हवामानात आमुलाग्र बदल होत गेल्याने पावसाळ्यात होणारे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी-कमी होत गेले. हीच परिस्थिती कायम राहिल्याने यंदा ते     50 टक्के सरासरी पेक्षा ही कमी  पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याची परिस्थिती आहे. बहुतेक शेतक:यांना खरीप हंगामाचा उत्पादन खर्च निघणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतक:यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध झाले नाही व पशुधनासाठी चारा देखील                म्हणावा तेवढा उपलब्ध होऊ शकला नाही.
यंदा कमी झालेल्या परतीचा पावसामुळे रब्बी हंगामाची देखील पेरणीला पोषक वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या हंगामात घेतल्या जाणा:या रब्बी पिकासाठी आवश्यक असलेली जमीन मशागतीची कामे वेळेत पूर्ण करता आली नसल्याची परिस्थिती आहे. 
दरम्यान आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरणीपूर्व पिकास आवश्यक असलेल्या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्याच्या स्थितीत हिवाळा सुरु असून देखील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आह़े येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास खरीपासह रब्बी हंगाम देखील वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता खचला असून या कठीण परिस्थितीत पशुधनासाठी चा:याची सोय व्हावी या हेतूने धडपडत आहे. 
 यावर उपाय म्हणून प्रशासनाने चा:यासाठी जलाशयाखालील गाळपेर जमिन उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामानात वारंवार होणा:या आमुलाग्र बदलामुळे पावसाळ्यात होणारे पर्जन्यामान दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याने येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. 
त्यामुळे प्रशासनाने यावर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजनांचा बहुवार्षिक आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Drought Support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.