तळोद्यात दुकानावर जीर्ण झाड कोसळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:09 PM2019-06-16T12:09:51+5:302019-06-16T12:09:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तहसील कार्यालय रस्त्यावरील एक जीर्ण झाड हवेच्या प्रचंड वेगामुळे शनिवारी दुपारी लगतच्या ङोरॉक्स दुकानावर ...

The dilapidated tree collapsed at the shop in Poulod | तळोद्यात दुकानावर जीर्ण झाड कोसळून नुकसान

तळोद्यात दुकानावर जीर्ण झाड कोसळून नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तहसील कार्यालय रस्त्यावरील एक जीर्ण झाड हवेच्या प्रचंड वेगामुळे शनिवारी दुपारी लगतच्या ङोरॉक्स दुकानावर कोसळले. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले. तथापि, बाहेरुन कामांसाठी येणा:या नागरिकांची गर्दी नव्हती त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.
शनिवारी दिवसभर वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे तहसील कार्यालय रस्त्यावरील एका ङोरॉक्स दुकानाला लागून असलेले लिंबाचे जीर्ण झाड दुकानावर कोसळले. वा:याचा एवढा वेग होता की संपूर्ण झाड बुंध्यासह उखडून दुकानावर पडले. यात दुकानाचे नुकसान झाले आहे. शनिवार असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची तहसील कार्यालयात येण्याचे प्रमाण कमी होते. त्यातही दुपारची वेळ होती. त्यामुळे रस्तेही निर्मनुष्य असल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली. परंतु या रस्त्यावरील अनेक झाडे जीर्ण होऊन अक्षरश: धोकेदायक झाले आहेत. ही झाडे केव्हाही कोसळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे तातडीने ती तोडण्यात यावी, अशी तक्रार तीन वर्षापूर्वी केली आहे. तथापि, याकडे अजूनही पालिकेने लक्ष घातले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शनिवारची घटना लक्षात घेऊन पालिकेने आता तरी जागे व्हावे, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे.
 

Web Title: The dilapidated tree collapsed at the shop in Poulod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.