जिल्हा तलाठी संघाचे प्रकाशा येथे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:14 PM2019-06-16T12:14:49+5:302019-06-16T12:14:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : नंदुरबार जिल्हा तलाठी संघाचे चौथे पंचवार्षिक अधिवेशन शनिवारी येथे झाले. या अधिवेशनात तलाठी संघाची ...

Convention at the light of District Talathi Sangh | जिल्हा तलाठी संघाचे प्रकाशा येथे अधिवेशन

जिल्हा तलाठी संघाचे प्रकाशा येथे अधिवेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : नंदुरबार जिल्हा तलाठी संघाचे चौथे पंचवार्षिक अधिवेशन शनिवारी येथे झाले. या अधिवेशनात तलाठी संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत जिल्हाधिकारी बालाजी मुंजुळे यांच्या हस्ते अधिवेशनात उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, प्रांतधिकारी  लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, तलाठी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष गौसमहमद लांडगे, जिल्हाध्यक्ष शिरीषचंद्र परदेशी, जे.डी. वसावे, पी.डी. निकम उपस्थित होते. या वेळी ज्ञानदेव डूबल यांनी तलाठय़ांना येणा:या अडचणी मांडल्या. त्यात तलाठय़ांकडे असलेले लॅपटॉप जुने झाले असून ते नवीन मिळावेत अशी मागणी केली. तसेच सेवापुस्तिकाही अद्ययावत करणे, सातबारा संगणकीकरणाला अनेक अडचणी येतात, सॅटेलाईटची अडचण येते. त्यामुळे शेतकरी तलाठींवर नाराज होतात. तलाठय़ांकडे असलेला अतिरिक्त भारामुळे दहा गावांना त्यांना जावे लागते. त्यामुळे एका ठिकाणी न थांबल्याने शेतकरी नाराज होतात. तसेच तलाठय़ांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी तलाठय़ांच्या वतीने जिल्हाधिका:यांकडे केली. आलेल्या शेतक:यांना आपल्या वडिलांप्रमाणे वागणूक द्या, त्यांना सन्मानाने बसवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहनही डूबल यांनी तलाठय़ांना केले. 
जिल्हाधिकारी मुंजुळे म्हणाले की, तलाठी बदली आणि प्रमोशनचा प्रश्न आधीच मार्गी लावला आहे. नवीन लॅपटॉपसाठी लवकरच तरतूद करण्यात येईल व सातबारा संगणकीकरणासाठी अडचणी येणार नाहीत यासाठीही प्रय} करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शिरीषचंद्र परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी बीडकर यांनी तर आभार के.डी. निकम मानले. कार्यक्रमासाठी डी.एम. चौधरी, जिजाबराव पाटील, चव्हाण  आदींनी परिश्रम घेतले.
या अधिवेशनात जिल्हा तलाठी संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष शिरीषचंद्र गोटू परदेशी (शहादा), कार्याध्यक्ष समाधान पाटील (तळोदा),       उपाध्यक्ष पी.टी. खंडारे (नंदुरबार), सरचिटणीस पी.डी. निकम (शहादा),  अपर चिटणीस प्रदीप पाटील  (शहादा), कोषाध्यक्ष जी.बी. कानडे (नंदुरबार), हिशोब तपासणीस  सी.टी. नाईक (नवापूर), सल्लगार  बी.ओ. पाटील (शहादा), संघटक   सी.टी. चंद्रात्रे (अक्कलकुवा),  विभागीय उपाध्यक्ष व्ही.एम. गावीत (नवापूर), विलास चौरे (तळोदा), के.जे. पावरा (धडगाव), महिला प्रतिनिधी सुरेखा राठोड (शहादा), आशा देवांग (शहादा), निमंत्रीत सदस्य एस.एस. तडवी (अक्कलकुवा), आर.डी. गांगुर्डे (नंदुरबार), व्ही.डी.सावळे (शहादा) यांचा समावेश आहे.

Web Title: Convention at the light of District Talathi Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.