Composite response in Nandurbar, smooth traffic | नंदुरबारात बंदला संमिश्र प्रतिसाद, वाहतूक सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारसह शहादा, नवापूर येथे बंद पाळण्यात आला. नंदुरबारात सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. रनाळा व शहादा येथील एसटीवर दगडफेक करण्यात आली़
महाराष्ट्र बंदला शहरातील विविध संघटनांनी पाठींबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. बंदचे आवाहन देखील करण्यात आले. सकाळपासूनच अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र सुरळीत होते. सकाळी 11 नंतर अनेक बाजारपेठा बंद होत्या. किरकोळ विक्रेते देखील रस्त्यांवर दिसून येत नव्हते. 10 वाजता नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्र्यानी निषेध आंदोलन केले. त्यानंतर बंदचेही आवाहन करण्यात आले. दुपारी साडेअकरा वाजेर्पयत बंद शांततेत होता. दरम्यान, पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैणात केला आहे. ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.