नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:45 PM2018-05-21T12:45:01+5:302018-05-21T12:45:01+5:30

नंदुरबार तालुका : कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाने ग्रामस्थ मेटाकुटीस

The competition is required to get water in Somsharpur in Nandurbar | नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 21 : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, शिंदे, कोळदे, खोंडामळी आदी परिसरात पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी हंडा, कळशी, बाधली घेऊन रांगा लावत असल्याची भिषण स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आह़े
गेल्या 15 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची पाणी टंचाई नंदुरबार तालुक्यातील गाव-पाडय़ांमध्ये निर्माण झालेली आह़े त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पाणी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आह़े एकीकडे लोकांना पैसे, दाग-दागिणे याचे भूषण असते तर, या गावात मात्र गावात पाणी येते त्या दिवशी कोणी किती बाधल्या पाण्याचा साठा केला यावर ग्रामस्थांकडून मनोमन समाधान व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे यावरुन तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा किती तीव्र आहेत हे दिसून येत आह़े 
मजुरांना बुडवावा लागतोय रोजगार
पाण्याची भिषण टंचाई असल्याने ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी पाण्याचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी मजुरांना रोजगार बुडवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े या ठिकाणी येणा:या पाण्याचा दाबही अत्यंत कमी आह़े त्यामुळे साहजिकच एक बाधली भरण्यासाठीही साधारणत  पाच ते दहा मिनीटांचा अवधी लागत असतो़ शिवाय पाणी येण्याच्या वेळेचीही शाश्वती नसल्याने पाणी येणार त्या दिवशी येथील ग्रामस्थ नळाकडे आस लावून बसलेली असतात़ 
वाढत्या तापमानामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी पातळी खोल गेली आह़े कुपनलिकासुध्दा आटल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून पाण्याच्या उपलब्धतेसाठी ‘रिबोरींग’ करण्यात येत आह़े तसेच काहींकडून कुपनलिकेत पाईप सोडून मोटारीव्दारे पाणी काढणे शक्य आहे काय याची चाचपणी करणे सुरु झाले आह़े या सर्व गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च होत आह़े आधीच नापिकी आणि त्यात पाण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे येथील पाणी पातळी साधारणत आठशे फुटांर्पयत खोल गेली आह़े एप्रिल महिन्यातच नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांची पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेली होती़ त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होत़े प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी होत आह़े
 

Web Title: The competition is required to get water in Somsharpur in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.