कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याने शहाद्यात 16 खत कंपन्यांविरोधात न्यायालयात दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:25 PM2017-11-16T13:25:27+5:302017-11-16T13:28:56+5:30

9 ठिकाणी तपासणी

Claims in court against 16 fertilizer companies | कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याने शहाद्यात 16 खत कंपन्यांविरोधात न्यायालयात दावे

कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याने शहाद्यात 16 खत कंपन्यांविरोधात न्यायालयात दावे

Next
ठळक मुद्देशहादा तालुक्यात 9 ठिकाणी तपासणी संबधित कंपन्यांना नोटीसा

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 16- पंचायत समितीचे कृषी विभागाने शहादा तालुक्यातील कृषी सेवाकेंद्रांची तपासणी करून खत व कीटकनाशांचे नमुने  तपासणीसाठी प्रयोग शाळेत दिले होत़े यातील 16 खत आणि दोन किटकनाशक कंपन्यांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर खत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम याप्रमाणे शहादा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आह़े 
2015-16 या वर्षात कृषी अधिकारी तथा बियाणे गुणवत्ता नियंत्रक ए़जी़कागणे यांनी शहादा तालुक्यात 9 ठिकाणी तपासणी करत कारवाई केली होती़ 2016-17 या वर्षातही त्यांनी 8 विक्रेत्यांकडून नमुने घेत कारवाई केली होती़ कारवाईनंतर   संबधित कपन्यांचे नमुने तपासणी करण्यात आली होती़ हे नमुने पूर्णपणे अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने संबधित कंपन्यांना नोटीसा दिल्या होत्या़ यात काहींनी दिलेल्या प्रतिसाद दिला होता़ तर इतरांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले होत़े तपासणी नमुने अप्रमाणित आढळल्याचा ठपका ठेवत सर्व 18 कंपन्यांविरोधात शहादा न्यायालयात बुधवारी दावा दाखल करण्यात आला़ न्यायालयात कामकाजादरम्यान संबधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ 
एव्हरग्रीन मायक्रोन्युट्रिएंट पुणे, सन अँड ओसिन अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, डेबॉन अॅग्रो इंडस्ट्रीज, कर्नाटका अॅग्रो केमिकल बँगलोर, अॅपेक्स अॅग्रो इंडस्ट्रीज भरुच, भाग्योदय इंडस्ट्रीज वाघोदा, निर्माण फर्टिलाइजर प्रा. लि, अनुमान अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, जी. बी.अॅग्रो इंडस्ट्रीज, एन. के. फर्टिलाइजर यांचे दुय्यम खतांचे नमुने अप्रमाणित तर कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड सिकंदराबाद, भारत अॅग्री फर्टिलाइजर पालघर, यांचे सिंगल सुपर फास्फेट चे नमुने अप्रमाणित आले होत़े इंडियन पोटॅश लिमीटेड, हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड भरूच, कृभको, जुआरी अॅग्रो केमिकल गोवा यांचे संयुक्त खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने त्यांच्याविरोधात शहादा येथील मा. न्यायालयात खत (नियंत्रण) आदेश 1985 च्या कलम 13 (2) व 19 (ब) तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 च्या नियम 3 व 7 अंतर्गत दावे दाखल करण्यात आले आहेत़ हेरंबा इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीचे इमिडॅक्लोप्रीड व अनु प्रोडक्ट लिमीटेड फरीदाबाद कीटकनाशक कंपन्यांचे नमुनेही संशयास्पद आढळल्याने दावा दाखल आह़े 

Web Title: Claims in court against 16 fertilizer companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.