निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:58 PM2019-07-20T12:58:53+5:302019-07-20T12:58:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम ...

Building unusable due to poor construction | निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी

निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र निकृष्ट बांधकामामुळे गेल्या दोन वर्षापासून या इमारतीत अद्यापपावतो दवाखाना सुरू करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
ओहवा येथील आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरवस्थेमुळे वैद्यकीय अधिका:यांच्या निवासस्थानी तात्पुरता दवाखाना सुरू करण्यात आला असून रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याचे रूग्णांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सकाळपासून कुवा या गावातून पायपीट करीत साक:या दिला पाडवी, शांती डेमश्या वसावे, सुरती रेमश्या वसावे हे रूग्ण उपचारासाठी आले. परंतु अनेक वेळाच्या प्रतिक्षेनंतरही वैद्यकीय अधिकारी वा कर्मचारी आले नसल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब नित्याचीच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  अतिदुर्गम भागातील ओहवा येथे आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून गेल्या दोन वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून इमारतीचा कोणता भाग केव्हा कोसळेल तेही सांगता येत नाही. पावसाळ्यात तर संपूर्ण इमारतीला गळती लागते. भिंती, कॉलम, बिम यांना मोठे तडे गेलेले आहेत. इमारतीचा मागील भाग मोडकळीस आला आहे. खिडक्यांच्या काचा फूटून मोकळे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका नसल्याने संडास-बाथरुममध्ये वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. शासन आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अगदी विदारक दिसून येते. याकडे कोणाचेही लक्ष वा नियंत्रण नसल्याचे बोलले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामासह वैद्यकीय अधिकारी व दांडी बहाद्दर कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Building unusable due to poor construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.