कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 08:07 PM2019-04-19T20:07:09+5:302019-04-19T20:07:33+5:30

शेतकरी चिंतातूर : पाण्याचे नियोजन होणे गरजेचे

The base reached by wells in Kanlada area | कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ

कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कानळदा, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा आदी परिसरातील गाव विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़
या परिसरातील विहिरींची पातळी खोल गेल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे़ काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे शक्य होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़
परिसरात आता पपई, कापूस, सोयाबिन आदी पिके घेण्यात येत आहेत़ त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आहे़ परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे़ पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे़
पुढील पावसाळा लांबला तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़
दरम्यान, ठिबकमुळे बागायतदार शेतकरी तरले असले तरी कोरडवाहू शेतकºयांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे़ ठिबक सिंचनावर केळी, पपई आदी पिके घेण्यात आलेली आहेत़ परंतु यंदा पाण्याची कमतरता असल्याने पिकांची लागवड यंदा कमीच राहिल असे जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़

Web Title: The base reached by wells in Kanlada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.